शनिवार, १६ मे, २००९

दत्ता मेघे, प्रफुल पटेल विजयी तर अंतुले पराभूत


वर्ध्यातून काँग्रेसचे दत्ता मेघे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या सुरेश वाघमारे यांचा पराभव केला आहे. या आधी मेघे 1991 साली नागपूर, 1996 साली रामटेक आणि 1998 साली वर्ध्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. सलग तीन लोकसभा निवडणुका तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना २००४ साली निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भंडार-गोंदियात काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोल यांनी बंडखोरी केल्याने प्रफुल पटेल यांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण पटेल यांनी तिरंगी लढतीत अखेर बाजी मारली. भाजपाचे विद्यमान खासदार शिशूपाल पटले यांना पराभव पत्करावा लागला आहे.रायगडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार ए.आर.अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांच्या कडून पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये अलिबागचे काँग्रेस आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे अंतुलेंच्या कार्यपध्दतीबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजीही होती.