mns लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mns लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ मे, २००९

सोमवार, २७ एप्रिल, २००९

मनसेचा महेश जेठमलानींवर आरोप


ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी काल राज ठाकरेंवर भडकले. जेठमलानी हे अफजल गुरूची वकिली करत असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत असल्यानं जेठमलानींनी राज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. जेठमलानी यांनी यासंदर्भात राज ठाकरेंना नोटीस पाठवून राज ठाकरे यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे हे एक बेजबाबदार नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी स्टार माझाशी बोलताना केलेच. पण त्याचबरोबर, माझ्यावर खोटेनाटे आरोप करणं राज ठाकरे यांना महागात पडेल, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.
भाजप शिवसेनेचे राज्यसभेतले माजी खासदार राम जेठमलानी यांनी राज ठाकरेंवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांच्या विरूद्ध,
मुंबई उपनगराचे निवडणूक अधिकारी विश्वास पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे., धर्माचा आधार घेऊन प्रचार केल्याचा आरोप महेश जेठमलानी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यासाठी पुरावा म्हणून महेश जेठमलानींचे वडिल राम जेठमलानी यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ख्रिश्चन मतदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे

रविवार, १९ एप्रिल, २००९

शनिवार, १४ मार्च, २००९

मनसे मुंबईतल्या सहाही जागा लढवणार

मनसे मुंबईतल्या लोकसभेच्या सहाच्या सहा जागा लढविणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात काही निवडक मतदार संघांमध्येही मनसे निवडणूक लढविणार आहे.मराठीचा मुद्द्यावर मनसे ठाम असून याच मुद्यावर मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा सेनेला जिंकता आली होती. पाच जागांवर काँग्रेसने मजल मारली होती. त्यामुळे शिवसेनेसाठी ही एक डोकेदुखी ठरणार आहे. जर मनसेमुळे शिवसेनेच्या मतांवर परिणाम होत असेल तर सहाजिकच भाजपच्या मतांवरही परिणाम होणार आहे.

सोमवार, ९ मार्च, २००९

तिसऱ्या वर्धापनदिनी मनसे थंड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च हा वर्धापनदिन असला तरी पक्षाकडून आज कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नाही. वर्धापनदिनी आज कोणत्याही मोठ्या सभेचं आयोजन 'मनसे'कडून करण्यात आलं नसल्यानं राजकीय वर्तूळातच हा चर्चैचा विषय झला आहे. वाढदिवशी मनसे थंड असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांमध्ये पाहिजे तसा उत्साह जाणवत नाहीये. मनसे लोकसभेसाठी मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचही सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांनी आज पुण्यात काय म्हटलयं....