varun gandhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
varun gandhi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १ मे, २००९
वरूण गांधींना दिलासा
भाजपा नेते वरूण गांधी यांना दिलासा मिळालाय. पॅरोलवर सुटलेल्या वरूण गांधी यांच्याविषयीची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं केली. वरूण गांधी हे १४ मे पर्यंत जेलबाहेर राहू शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयांनं दिलाय. पिलिभीत मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १३ मे ला मतदान होणार आहे. आणि न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार वरूण गांधी यांना १४ मेपर्यंत जेलच्या बाहेर राहण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिलिभीतच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला होता. वरूण यांनी या प्रकारानंतर सरेंडरही केलं होतं, तसंच पुन्हा अशा प्रकारचं प्रक्षोभक भाषण करणार नाही असा, विश्वास दर्शवणारं पत्रही न्यायालयाला दिलं होतं.
सोमवार, ३० मार्च, २००९
वरूणवर रासुका

पिलिभीत येथील प्रक्षोबक भाषण प्रकरणी संजय गांधी यांचा मुलगा वरूण गांधी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. रासुका लावल्यामुळे वरूण गांधींला जामीनासाठी अडचणी येणार आहेत. दरम्यान भाजपने या कारवाईला व्होट बँकेचं राजकारण म्हटलं आहे तसेच पिलिभीत मधून वरूण हेचं उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.वरूण गांधी यांच्यावर तीन आरोपा करण्यात आले असून त्या आरोपांखाली त्यांच्यावर रासुका लावण्यात आला आहे. पहिला आरोप हा प्रक्षोभक भाषण प्रकरणी तर दुसरा हा रॅलीचा रूट बदलला म्हणून आणि तिसरा आरोप हा पिलिभीत जेलच्या बाहेर वरूण गांधी समर्थकांना केलेल्या राड्याप्रकऱणी आरोप लावण्यात आला आहे.
बुधवार, २५ मार्च, २००९
वरुण गांधी यांची याचिका फेटाळली

भाजपाचा युवा नेता वरुण गांधी याची याचिका अलाहाबाद हायकोर्टनं फेटाळलीयं. पिलिभीत इथं वादग्रस्त भाषण केल्याबद्दल वरुण गांधी याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आलीयं. याविरुद्ध वरुणनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टानं वरुण गांधी याची याचिका फेटाळली दरम्यान,पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांनी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून वरुणने ही प्रतिक्रिया व्यक्त केलीयं. पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला सुरुवातीलाचं शिवसेनेनं पाठिंबा दिला
बुधवार, १८ मार्च, २००९
वरूण गांधींच्या यापुढील सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग
वरूण गांधींच्या यापुढील सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी पिलिभितच्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलिस उपअधिक्षकांची बदली करण्यात आली आहे.वरूण गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.वरूण गांधी यांनी सहा मार्चच्या सभेत पिलिभित येथे प्रक्षोभक भाषण केलं होतं. निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर वरूण गांधी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 153-ए नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.निवडणूक आयोगाने वरूण गांधी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.
हे राजकीय षड्यंत्र - वरुण गांधी

आपल्या भाषणाबाबत वरुण गांधींनी आज मीडियासमोर खुलासा केला आहे. पिलभीतमध्ये केलेल्या भाषणावर सफाई देताना वरूण यांनी माझ्याविरोधात विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. मी भारताविरोधी कोणतंच भाष्य केलं नाही.मला हिंदुत्वावर गर्व असून माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे.मी गांधी,हिंदू आणि मुख्य म्हणजे भारतीय आहे.समाजात असंतोष परसरविण्याचा माझा उद्देश अजिबात नाही. मी नेहमी भारताच्या हिताचाच पुरस्कार केलाय. शिवाय ४ तारखेचं भाषण १६ तारखेला दाखवलंच कसं असा सवालही त्यांनी विचारलाय.
मंगळवार, १७ मार्च, २००९
कोणी थप्पड मारली,तर त्याचा हातच तोडून टाका - वरुण गांधी
वरूण गांधी..गांधी घराण्याचे आणखी एक वारसदार... मेनका गांधी यांचे पुत्र... भाजपाचे लोकसभेसाठीचे उमेदवार. उत्तरप्रदेशातील पीलीभित मतदारसंघातून ते निवडणूक ल
ढवतायत. त्यांनी देशाच्या संस्कृतीची एकतेची आणि परंपरेला लाज आणणारं भाषण केलं.'जय श्रीराम'ची घोषणा करीत देशातील मुस्लिमधार्जिण्या धोरणाविरोधात वरुण गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.'हिंदूंकडे बोट दाखवण्याची कोणी हिंमत केली तर तो हात मी तोडून टाकीन' अशा कडक शब्दात प्रचारसभेत वरुण गांधी बरसले.
ढवतायत. त्यांनी देशाच्या संस्कृतीची एकतेची आणि परंपरेला लाज आणणारं भाषण केलं.'जय श्रीराम'ची घोषणा करीत देशातील मुस्लिमधार्जिण्या धोरणाविरोधात वरुण गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला.'हिंदूंकडे बोट दाखवण्याची कोणी हिंमत केली तर तो हात मी तोडून टाकीन' अशा कडक शब्दात प्रचारसभेत वरुण गांधी बरसले.या प्रक्षोभक भाषणाची दखल निवडणूक आयोगानं घेतली आणि त्यांना नोटीसही बजावली. पण आता हे प्रकरण इतक्यात शांत होण्याची चिन्हं नाहीएत. कारण भाजपामधील मुस्लिम नेते वरूण गांधींच्या भाषणावर नाराज झाले आहेत. त्यांनी वरूण गांधींना धारेवर धरलय. आणि तोंडावर लगाम घालण्याचा इशाराही दिलाय.पण प्रकरण चिघळल्यावर वरूण गांधींनी मीडियाला मिळालेली भाषणाची सीडी बनावट असल्याचं म्हटलय.
दुसरीकडे भाजपा नेते व्यंकय्या नायडूंनी मात्र वरूण गांधींना पाठिंबा दिलाय. त्यामुळे वरूण गांधी प्रकरणावरून भाजपामध्ये दोन गट पडण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वरूण गांधींनी एका समाजाला दुखावलय. सुजाण मतदार मतपेटीच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवतील. मात्र निवडणुकीत मताचा जोगवा मागायला जाणा-या भाजपाच्या अडचणीत आणखीनच भर पडलीए हे मात्र नक्की.
भाषणाआधी पुरेशी तयारी करा!
आम्ही आमच्या उमेदवारांना भाषणाची तयारी करण्याची तसेच संसदीय भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सिद्धार्थ नाथ यांनी दिल्लीत सांगितलं. पिलिभितमधील प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करू पण त्या भाषणात खरोखर प्रक्षोभकपणा होता का याचे पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरणी भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी वरूण गांधी यांच्यावर टीका केली आहे.
वरूण गांधी यांनी पिलिभित येथील भाषणात म्हणाले "हा काँग्रेसचा हात नसून भाजपचं कमळाचं फूल आहे. आणि हे फूल.......चे शीर कापेल, जय श्री राम." इंदिरा गांधी यांचे नातू असलेले वरूण गांधी हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर "हिन्दू हे कमकुवत आणि नेतृत्वहीन झाले आहेत असं कुणी म्हणत असेल तर मी त्यांचे हात कापेल"
लेबल:
भाजप,
वरूण गांधी,
bjp,
varun gandhi
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)