गुरुवार, १२ मार्च, २००९

...तर देशाच्या राजकारणात बदल होतील

पंतप्रधानपदाच्या शर्यती असलेल्या शरद पवारांनी आज नांदवडमध्ये सातारा जिल्ह्यानं राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात काही बदल घडून येतील असं म्हटलं आहे. लोकसभा लढविण्य़ाची इच्छा नव्हती पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. लोकांच्या शुभेच्छा घेण्यासाठी आपण नांदवडमध्ये आलो आहोत तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवारांनी आज त्यांच्या मूळगावी नांदवळमध्ये म्हातोबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. शरद पवारांनी आपल्या मुळगावी नांदवळमध्ये नारळ फोडून सुरूवात केली आहे. दरम्यान येत्य़ा चार दिवसांमध्ये शरद पवार 30 सभा घेणार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातही शरद पवार सभा घेणार आहेत.

मंगळवार, १० मार्च, २००९

छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादीत


कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत आणि जागावाटपाबाबत तळ्यात मळ्यात असे वातावरण असताना आणि चर्चेच्या गुऱ्हाळांचा चरखा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत रोजच्यारोज दळला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या संभाजीराजेंनी प्रथमच अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. संभाजीराजेंनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी निवड केलीय तीसुद्धा काँग्रेसशी युती करण्याबाबत झोक्यावर झोके घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी. त्यांनी कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी ते सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्य करत होते. छ. संभाजीराजेंचे बंधू मालोजीराजे हे काँग्रेसचे आमदार आहेत.

मनसेची व्यंगात्मक धुळवड


मनसेनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होळीचं निमित्त साधून रणधुमाळीला सुरूवात केली आहे. मनसेच्या महाराष्ट्र माझा अंकात आज एक व्यंगचित्र छापून आलं आहे. हे कार्टुन दुस-या तिस-या कुणाचं नाही. हे तर आहे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं. विशेष म्हणजे या कार्टुनमध्ये शरदपवारांच्या कडेवर बसले आहेत उद्धव ठाकरे. पाहा या कार्टूनचा व्हिडीओ

सोमवार, ९ मार्च, २००९

तिसऱ्या वर्धापनदिनी मनसे थंड

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च हा वर्धापनदिन असला तरी पक्षाकडून आज कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं नाही. वर्धापनदिनी आज कोणत्याही मोठ्या सभेचं आयोजन 'मनसे'कडून करण्यात आलं नसल्यानं राजकीय वर्तूळातच हा चर्चैचा विषय झला आहे. वाढदिवशी मनसे थंड असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांमध्ये पाहिजे तसा उत्साह जाणवत नाहीये. मनसे लोकसभेसाठी मोजक्या ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचही सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांनी आज पुण्यात काय म्हटलयं....

शिर्डीतून नाही तर मुंबईतून उमेदवारी द्या - रामदास आठवले


शिर्डी शक्य नसेल तर दक्षिण मुंबईतून उमेदवारी द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी काँग्रेसपक्षात सामावून घ्यायला हवं तसेच पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची घोषणा करायला हवी असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

सेना भाजपा दरम्यान जागा वाटपाचा तिढा कायम

शिवसेना भाजपामध्ये 22-26 असा फॉर्म्युला फायनल झाल्याचं सांगितलं जातय पण त्याची अधिकृत घोषणा मात्र अजुनही झालेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार भिवंडी मतदारसंघावरून सेना भाजपात अजुनही वाद असल्याचं सांगितलं जातय. पण जो फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जातय त्यानुसार भाजपानं कल्याणचा आग्रह सोडलेला आहे त्यामुळे तिथं सेना उमेदवार लढेल तर दक्षिण मुंबई आणि जळगावच्या जागेवरचा हक्क सेनेनं सोडला असून तिथं भाजपाच निवडणूक लढवेल असं सांगितलं जातय. पण सध्या घोडं अडलय ते भिवंडीच्या जागेवरून. पण सेना भाजपातले सर्व वाद संपल्याचा दावा शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केला आहे.

२००९ वर्ष निवडणुकांचं


यंदा फक्त भारतातच नाही तर तब्बल 63 देशातले लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगभरातल्या 64 देशांमध्ये निवडणुका होत आहेत.
त्यामुळेच 2009 हे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणून ओळखलं जाईल. एकीकडे केवळ 37,000 लोकसंख्या असलेला लेशिटेनस्टाईन, 83,000 लोकसंख्येचा अँडोरा तर दुसरीकडे 100 कोटी लोकसंख्येचा भारत निवडणुकांना सामोरं जात आहेत.
इराण, दक्षिण आफ्रिका, जपान, अफगाणिस्तान, मेक्सिको आणि पँलेस्टाईन सारख्या महत्वाच्या देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडे जगाचं लक्ष असेल.
वर्षाच्या सुरवातीलाच इस्त्रायल आणि एल साल्वादोर मध्ये निवडणुका पार पडल्या.
आफ्रिका खंडात गेली अनेक दशकं यादवीने होरपळलेल्या देशांमध्येही निवडणुका होत आहेत. त्या जर व्यवस्थित पार पडल्या आणि स्थिर राजवटी स्थापन झाल्या तर भरडून निघालेल्या लोकांना काही अंशी तरी दिलासा मिळेल.
सुदानमधल्या दारफर प्रांतातल्या दुष्काळात एका दशकात पाच लाख लोकं मृत्युमुखी पडले. त्याच्या शेजारी असलेल्या चाडमध्ये दारफर प्रांतातल्या दोन लाख लोक निर्वासितांनी आश्रय घेतलाय. चाड मध्येही निवडणुका होत आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचं वरदान आणि यादवीचा अभिशाप असलेल्या काँगोमध्येही निवडणुका होणार आहेत. काँगोतल्या हिऱ्यांच्या खाणींमुळे लक्षावधी लोकांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली आहे.
काही देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे आणि त्यांच्या निकालांचे पडसाद जगातल्या राजकारणावरही उमटणार आहेत. इराणमधल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कट्टरपंथीय आणि मवाळवादी यांच्यातल्या संघर्षात कोण जिंकणार यावर अमेरिका बारकाईने लक्ष ठेवुन असणार आहे.

इराकमधली जनता निव़डणुकांच्या माध्यमातून इराकी आणि अमेरिकी प्रशासनादरम्यान झालेल्या कराराचं भवितव्य निश्चित करणार आहे. अमेरिकन सैन्याचे तळ इराकी भूमीवर राहू द्यायचे किंवा नाही याचा कौल इराकी जनता देईल. त्याचप्रमाणे जगातले चौदा देश सार्वमत देखील बजावणार आहेत.