भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती भंगणार की अभेद्य राहणार हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. भाजप-शिवसेनेतील सर्वच वाद संपल्यात जमा असल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. युतीचा २२-२६ चा फॉर्म्यूला कायम असल्याचही मनोहर जोशी यांनी सांगितलं आहे.शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे 22 वर्षापासून चिरंतन पुरातन साथीदार म्हणून ओळखले जातात. शिवसेना भाजपच्या युतीवर काही राजकीय घडामोडींमुळे प्रश्न चिन्ह लागले होते.छगन भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. छगन भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतल्यापासून चर्चेला ऊत आला होता. राजकीय समीकरण बदलणार का? शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती होईल का? शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडेल का? यावर चर्चेची गुऱ्हाडे सुरू झाली होती.शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीवरून काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या गोटातही चिंता वाढली होती.
सोमवार, ९ मार्च, २००९
माढा व्हाया नांदवळमध्ये 'पॉवर'बाज उत्साह
(नवनाथ सकुंडे) साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील मौजे नांदवळ गाव. गावच्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर उत्साहाचं वातावरण. गावातले पुढारी तयारीला लागलेत...साहेबांच्या जोरदार स्वागताची जय्यत तयारी...महाराष्ट्रासह राष्ट्रीय राजकारणातही आपल्याभोवती वलय निर्माण करणारे शरद पवार यंदा पहिल्यांदाच बारामती सोडून माढा मतदार संघातून लोकसभा लढवत आहेत. माढ्याचा गड सर करण्यासाठी करावयाच्या प्रचाराचा नारळ पवार आपल्या मुळ गावी नांदवळमध्ये फोडणार आहेत. प्रचाराचा श्रीगणेशा करण्याची तारीख आहे 12 मार्च...पॉवरबाज पवारसाहेब आपल्या गावात येणार म्हणून नांदवळच्या कच्चा-बच्चापासून सर्वांच्याच मनात उत्साह संचारला आहे....गावच्या पुढाऱयांपासून सर्वजण साहेबांचे स्वागत धुमधडाक्यात करण्याच्या तयारीला लागलेत."पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा नादंवळात आले होते नंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले..राष्ट्रवादी काँग्रेस काढली. केंद्रात कृषीमंत्री झाले. इतक्या वर्षानंतर साहेब गावात येताहेत त्यामुळं आम्ही गावच्या भैरवनाथ मंदिराची रंगरंगोटी करतोय. हे मंदिरही पवारसाहेबांच्याच 'कृपे'ने बांधलय." नांदवळचे सरपंच विजयकुमार शंकरराव पवार मोठ्या उत्साहात सांगतात.
12 मार्चला साहेबांच्या स्वागताची जय्यत तयारी गावकऱयांनी चालवली आहे. नांदवळकरांच्या मनाची जी अवस्था आहे तीच अवस्था माढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह नागरिकांचीही आहे. शरद पवार यांनी माढामधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर, आता तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांना विक्रमी मताधिक्यानं निवडून देण्यासाठी कामाला लागलेत.31 मार्चला ते सोलापूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. राज्याचे ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर माढा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी, शेकापच्याही स्थानिक पदाधिका-यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र माढ्यात असं उत्साहाचं वातावरण असताना आ. प्रतापसिंह मोहिते पाटील मात्र पवारांच्या उमेद्वारीनं नाराज झाले असल्याची पाल राजकीय गोटात चुकचुकली... दरम्यान शरद पवारांच्या उमेदवारीला आपला सक्रीय पाठिंबा असून आपण पूर्ण ताकदीनं त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची भूमिका आ. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनीही घेतलीय
लेबल:
माढा,
राष्ट्रवादी,
लोकसभा,
शरद पवार
राष्ट्रवादी भवनात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षातल्या इच्छुक उमेदवारांची आपली वर्णी लागावी यासाठी धावपळ सुरू आहे. रविवारी टिळक भवनात काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
तर आज राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पक्षातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू आहे. पण काल काँग्रेसच्या मुलाखत प्रक्रियेत झालेल्या गोंधळातून धडा घेऊन पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढवला असल्याचं सांगितलं जातं.
तर आज राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पक्षातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचं काम सुरू आहे. पण काल काँग्रेसच्या मुलाखत प्रक्रियेत झालेल्या गोंधळातून धडा घेऊन पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढवला असल्याचं सांगितलं जातं.
शनिवार, ७ मार्च, २००९
अखेर शरद पवार माढ्यातून निवडणूक लढविणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. शरद पवार यांनी पुण्य़ात आज ही घोषणा केली.विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला होता.सुरवातीला शरद पवार नेमके कुठून निवडणूक लढविणार य़ासाठी अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. शरद पवार हे शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवतील अशाही शक्यता वर्तविण्यात येत होती. नाशिक जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनीही शरद पवारांनी नाशिकमधून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता.
यापूर्वी शरद पवार बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत होते.
लेबल:
युती,
राष्ट्रवादी,
विजय सिंह मोहिते पाटील,
शरद पवार,
शिवसेना
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)