पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान आहेत, अशी टीका करणा-या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज पंतप्रधानांनी शालजोडीतले टोले लगावले. भारताचा विकास करणा-या आणि भारतीयांना एकत्र ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची देशाला गरज आहे. जाती, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणा-या आणि बुरसटलेली, जुनीपुरानी विचारधारा बाळगणा-या नेतृत्वाची गरज नाही, असा टोला डॉ. मनमोहन सिंग यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्योगपती, बॉलिवूडशी संबंधित व्यक्ती तसेच विविध वर्गांच्या प्रतिनिधींची खास बैठक घेतली. त्यावेळी देशाचे नेतृत्व कसे असावे, याचा ताळेबंद पंतप्रधानांनी उलगडून दाखवला. भारताला प्रगतीपथावर नेणारे नेतृत्व देण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, असे सांगताना देशाच्या, मुलाबाळांच्या आणि नातवंडाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसला मत द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जगामध्ये सध्या नेमक्या काय घडामोडी चालू आहेत, याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. भारतीयांमध्ये एकोपा निर्माण करु शकेल, असे नेतृत्व हवे आहे. जात, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांमध्ये भेदाभेद करणारे आणि भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणारे नेतृत्व नको. भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व देशाला हवे. कायम भूतकाळात वावरणारे नेतृत्व नको. बुरसटलेली, कालबाह्य विचारधारा असलेले नेतृत्व नको, अशा शब्दांत अडवाणींचा नामोल्लेख टाळून डॉ. सिंग यांनी आपणच पंतप्रधानपदासाठी परफेक्ट उमेदवार असल्याचे संकेत दिले.
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात भारताचा विकास दर ९ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात तो जेमतेम ५.८ टक्क्यांच्या आसपास होता. काँग्रेसच्या सर्वांना सामावून घेण्याच्या धोरणामुळेच देशाची प्रगती होऊ शकली. याउलट भाजपच्या विभाजनवादी धोरणांमुळे विकासाचा वेग मंदावला, अशी तोफही पंतप्रधानांनी यावेळी डागली. आजमितीला आंतरराष्ट्रीय वर्तुळात भारताच्या शब्दाला मोठे महत्त्व आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर भारताच्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते. भविष्यामध्ये एक ना एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला निश्चित स्थान मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
मुंबईमध्ये येताना आपल्या मनात संमिश्र भावना असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुःखात मी सहभागी आहे. मुंबईकरांनी मोठ्या धीराने या आपत्तीला तोंड दिले. मुंबई व महाराष्ट्राच्या या स्पिरीटला आपण सलाम करतो, असे सांगून दहशतवाद आणि अतिरेकीवाद हीच देशापुढील मुख्य आव्हाने आहेत. आपण सगळ्यांनी सामूहिक मुकाबला करुन दहशतवाद्यांचे फुटीर मनसुबे यशस्वी होऊ देता कामा नये. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे आणि ती क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
मुंबई हे ख-या अर्थाने जागतिक शहर आहे. मुंबई म्हणजे आधुनिक, प्रगतीशील भारताचे प्रतिक आहे. आधुनिक भारत घडवण्याची संधी जनतेला आम्हाला पाच वर्षांपूर्वी दिली. ते स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. राष्ट्र उभारणीचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी केले.