
देशाचा कारभार आतापर्यंतच्या सर्वात कमकुवत पंतप्रधानांच्या हाती असल्याचं अडवाणींचं वक्तव्य पंतप्रधान मनमोहन सिंहांनीं चांगलचं मनाला लावून घेतलेलं दिसतंय.दिल्लीत डॉ बाबासाहेब आंबेकडरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कारण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांचेही पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले अडवाणी आणि मनमोहन सिंह एकाच मंचावर आले. पण सध्या त्या दोघांच्यात सुरू असेलल्या वाकयुद्धाचा परिणाम इतका गंभीर झालाय की अडवाणी आणि पंतप्रधान एकमेककडे बघणंही टाळलं. त्यानंतर अडवाणींनी केलेल्या अभिवादनानंतर पंतप्रधानानी तेही स्वीकारलं नाही. आता राजकारणात विशेषतः निवडणूकांच्या प्रचारात एकामेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण सध्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर जाऊन होत असलेल्या प्रचारामुळे राजकारण खरोखरोच दुषित झालं हेच या प्रसंगावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं.