मंगळवार, १४ एप्रिल, २००९
एका मताचं मोल
भारतातल्या कोट्यावधी मतदारांपैकी सर्वात भाग्यवान मतदार जर कोण असेल तर ते आहेत भारतदास दर्शनदास त्याला कारणही तसचं आहे कारण त्यांना मतदानासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाहीये. त्यांच्या एकट्यासाठी स्वतंत्र मतदानाची सोय करण्यात आलीयं. पुजारी असलेले भारतदास दर्शनदास हे गुजरातच्या अतीदुर्गम भागातील गीरच्या वाघांच्या अभयअरण्यात वास्तव्य करतात. त्यांना मतदान करता यावं याकरता तब्बल तीन निवडणूक अधिकारी आणि दोन पोलीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसह रवाना होणार आहेत. त्याकरता त्यांना नदी आणि वाळवंट पार करण्याचं दिव्य करावं लागणार आहे. गेली एक दशक ते जंगलातल्या एका छोट्या मंदिरात वास्तव्य करत आहेत. तिथे विजेची तसचं पाण्याची आणि आरोग्य सूविधा नसल्याबाबत त्यांची तक्रार आहे. ते म्हणतात जवळच्या गावात पोहचायला त्यांना तब्बल दोन तास पायपीट करावी लागते. काही वेळा त्यांच्या घराबाहेर वाघ येऊन मुक्काम ठोकतात अशावेळेस ते जाईपर्यंत प्रतिक्षा करावी लागते असंही त्यांनी सांगितलं. गिर अभयाअरण्यातील मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांच्या दानावर ते आपला उदरनिर्वाह करतात. गिरचं अभयअरण्य १४०० स्केवअर मीटर प्रदेशावर पसरलेलं आहे. या संरक्षित जंगलात वास्तव्य करणारे मालधारी आदिवासी त्यांना खायला देतात. पण त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत वाद असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. मालधारी आदिवासींच्या मुलांना धार्मिक ग्रंथांतील शिकवण देतात. रेडिओवरील बातम्या ऐकून ते देशातील घडामोडींची माहिती ठेवतात. माझ्या एका मताला फारशी किंमत नसल्यानेच आजवर कुणीही राजकारणी आपल्या भेटीस आलं नसल्याचं सांगताना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्या विषयीचा निर्धारही ते व्यक्त करतात.
अपडेट14 एप्रिल
* पहि्ल्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार संपला, 5 वाजेपासून प्रचार बंद
* लालकृष्ण अडवाणी यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटवर पंढरपुरात गुन्हा दाखल
* ४ एप्रिलला झालेल्या सभेसाठी पोलिसांच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल
* मला बंदीवासात टाकण्यासाठी जेल अजून तरी अस्तित्वात नाही- नरेंद्र मोदींची कपिल सिब्बल यांच्या टीकेला उत्तर
* मोंदींनी काँग्रेसवर टीका करताना जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी – कपिल सिब्बल

मनमोहन-अडवाणी आमनेसामने

देशाचा कारभार आतापर्यंतच्या सर्वात कमकुवत पंतप्रधानांच्या हाती असल्याचं अडवाणींचं वक्तव्य पंतप्रधान मनमोहन सिंहांनीं चांगलचं मनाला लावून घेतलेलं दिसतंय.दिल्लीत डॉ बाबासाहेब आंबेकडरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कारण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांचेही पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले अडवाणी आणि मनमोहन सिंह एकाच मंचावर आले. पण सध्या त्या दोघांच्यात सुरू असेलल्या वाकयुद्धाचा परिणाम इतका गंभीर झालाय की अडवाणी आणि पंतप्रधान एकमेककडे बघणंही टाळलं. त्यानंतर अडवाणींनी केलेल्या अभिवादनानंतर पंतप्रधानानी तेही स्वीकारलं नाही. आता राजकारणात विशेषतः निवडणूकांच्या प्रचारात एकामेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण सध्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर जाऊन होत असलेल्या प्रचारामुळे राजकारण खरोखरोच दुषित झालं हेच या प्रसंगावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
सोमवार, १३ एप्रिल, २००९
अपडेट 13 एप्रिल
*राज ठाकरे यांची अहमदनगरमधील सिन्नरला जाहीर सभा
दहशतवादी संसदेच्या थोड्या आत घुसले असते तर देशाचे अनेक प्रश्न सुटले असते -राज ठाकरे
* घर के आखाडे मे हर कोई पहैलवान होता है, राज ठाकरे साहब पटना आकर बोलके दिखाये- शेखर सुमन यांची पटना साहिब येथे राज ठाकरे यांच्यावर टीका
* शेखर सुमन कोन आहे मी ओळखत नाही - शर्मिला ठाकरेंचे शेखर सुमन यांच्या टीकेला मुंबईत उत्तर
*हे काही पक्ष मराठी-मराठी करणारे आपल्या मुलांना शिकायला कॉन्व्हेंटमध्ये पाठवतात- शरद पवारांची टीका.

दादा मला एक वहिनी आण...
प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरं दिली.पत्रकारांच्या एका प्रश्नावर राहुल गांधी हे एकदिवस देशाचे पंतप्रधान नक्की होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण त्याआधी तो नवरदेव झालेला पाहायला आवडेल असंही म्हटलं..
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)