शुक्रवार, १ मे, २००९
वरूण गांधींना दिलासा
भाजपा नेते वरूण गांधी यांना दिलासा मिळालाय. पॅरोलवर सुटलेल्या वरूण गांधी यांच्याविषयीची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं केली. वरूण गांधी हे १४ मे पर्यंत जेलबाहेर राहू शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयांनं दिलाय. पिलिभीत मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १३ मे ला मतदान होणार आहे. आणि न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार वरूण गांधी यांना १४ मेपर्यंत जेलच्या बाहेर राहण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिलिभीतच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला होता. वरूण यांनी या प्रकारानंतर सरेंडरही केलं होतं, तसंच पुन्हा अशा प्रकारचं प्रक्षोभक भाषण करणार नाही असा, विश्वास दर्शवणारं पत्रही न्यायालयाला दिलं होतं.