शनिवार, १६ मे, २००९

माणिकराव गावितांचा अभूतपूर्व विक्रम

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी सलग नव्यांदा विजय मिळवला आहे. गावित १९८१ साली पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर ते एकदाही पराभूत झाले नाहीत.

यावेळेस माणिकराव गावितांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचे भाऊ शरद गावीत यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे गावित आणि गावित यांच्या लढतीत मतविभागणीचा फायदा भाजपाच्या सुहास नटवदकरांना मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण हे सर्व आडाखे फोल ठरवत माणिकरावांनी विजयी परंपरा कायम राखली.