नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणली आहे. मनसेचे हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. जातीयवादी प्रचाराने नाशिक ढवळून निघालं होतं. मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करा असा उघड प्रचार झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जातीने लक्ष घातलं होतं.
प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.
शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.
मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.