मंगळवार, ५ मे, २००९
चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे उमेदवार आज पूर्ण ताकदीनं प्रचार करतील. देशभरात चौथ्या टप्प्यात 85 जागांसाठी, सात तारखेला मतदान होतंय. त्याचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपेल. जम्मू काश्मीर, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये सात तारखेला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर, पंजाबमधल्या 4 जागांसाठी, हरियाणातल्या 10 जागांसाठी, राजस्थानातल्या 25 जागांसाठी, दिल्लीतल्या 7 जागांसाठी , उत्तर प्रदेशातल्या 18 जागांसाठी, बिहारमधल्या 3 आणि पश्चिम बंगालमधल्या 17 जागांसाठी मतदान होणार आहे.