शुक्रवार, १५ मे, २००९

राहुल का जादू चल गया...


राहुलबाबा का मॅजिक उत्तरप्रदेश में चल गया है. राहुल गांधींच्या झंझावती प्रचारामुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसने धक्कादायक आघाडी घेतली आहे. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला कायम मार खावा लागत होता. पण राहुल गांधींच्या करिष्म्यामुळे काँग्रेस उत्तरप्रदेशात परत एकदा धावू लागला आहे.
पहिल्या तीन तासांच्या मोजणीत काँग्रेस वीस मतदासंघात आघाडीवर आहे. गेल्या काही दशकातली ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
समाजवादी पक्षही २० ठिकाणी आघाडीवर आहे. बहुजन समाज पार्टीने ४० ते ५० जागा जिंकण्याचा दावा केला होता. बसपा २१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर आहे. अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल फक्त दोन जागा आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश मधील मतदार राष्ट्रीय पक्षांकडे झुकू लागल्याचं चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.