शनिवार, १६ मे, २००९

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हादरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये अपक्ष बंडखोर सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा धक्कादायक पराभव केला आहे. आजवर लोकसभेच्या निवडणुकीत कधीही पराभूत न होण्याची परंपरा मंडलिक यांनी राखली आहे.
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.