शनिवार, १६ मे, २००९

सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त विजयी, राम नाईक पराभूत



सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे शरद बनसोडे यांचा पराभव केला आहे. माकपचे आमदार नरसय्या आडम यांनी बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिंदे अ़डचणीत आले होते.

पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.