दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ,"काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देतील जर डावे 190 जागा मिळवण्यात यशस्वी झाले तर!" असे वक्तव्य केले.
जर डाव्यांनी 180 ते 190 जागा मिळवल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.जर असं झालं तर त्यांना पाठिंबा देणारा मी पहिला असेन,असं राहुल गांधी यांनी दिल्लीत अशोका हॉटेल येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
काँग्रेस आणि डावे यांच्या तत्वप्रणालीत फरक आहे.पण तरिही काही गोष्टींमध्ये साम्य आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी असाही आत्मविश्वास व्यक्त केला की डावे मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून मान्य करतील.मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत आणि मनमोहन सिंग यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे.
अडवाणी यांच्या स्विस बँकेवरील टिप्पणीबाबत राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं- मी अडवाणींच्या वक्तव्याबाबत पूर्णपणे सहमत आहे.स्विस बँकेत 60 वर्षांपासून भारताचे पैसे आहेत.आपण सर्वांनी मिळूनच ते पैसे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी एकत्र आले पाहिजे.ह्या प्रश्नाबाबत फक्त चर्चा करण्याऐवजी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.