शनिवार, १६ मे, २००९

शिवसेनेने तीन जागा जिंकल्या


महाराष्ट्रातील बहुतेक जागांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. त्यापैकी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. परांजपे यांचा सलग दुसरा विजय तर डावखरे यांचा सलग तिसरा पराभव.

शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.

शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.