गुरुवार, १४ मे, २००९

सोनिया गांधी शरद पवारांमध्ये चर्चा

निवडणुकांचे निकाल आता अवघ्या काही तासांनी लागणार आहेत. सरकार स्थापनेच्या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल रात्री सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं.

सोनिया गांधींनी काल राष्ट्रीय जनता दलाचे लालु प्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्याशी फोनवर चर्चा केली.

युपीए आणि एनडीए यांना जवळपास सारख्याच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने बहुमताच्या दृष्टीने एक एक जागा महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही आघाड्यांनी राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचण्याचे सर्व प्रयत्न सूरु केले आहेत.
काल रात्री मुकेश अंबानींनी प्रफुल पटेल यांच्या समवेत शरद पवार यांची भेट घेतल्याने राजधानीत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.