रविवार, २४ मे, २००९

बुधवार, २० मे, २००९

रविवार, १७ मे, २००९

अपडेट 17 मे

  • काँग्रेस कार्यसमितीची बैठक
  • बैठकीला पंतप्रधान मनमोहन सिंग,सोनिया गांधी उपस्थित
  • काँग्रेसला लालूप्रसाद यादवांची गरज नाही- बिहार काँग्रेस प्रभारी इकबाल सिंह यांचं वक्तव्य
  • लालकृष्ण अडवाणींना भेटले संघाचे नेते
  • उमा भारती अडवाणींना भेटल्या
  • समाजवादी पार्टी काँग्रेसला पाठिंबा देणार - अमरसिंग

स्वबळावर जिंकण्याची क्षमता काँग्रेसकडे - विलासराव देशमुख

राजधानीत काँग्रेसचा जल्लोष

दो मारा पर सॉलिड मारा - राज ठाकरे

शनिवार, १६ मे, २००९

राहुल की जय हो !

मनेका,चिदंबरम फेरमतमोजणीत विजयी

महाराष्ट्रात अनेक दिग्गजांना जनतेनं आसमान दाखवलं. यात केद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता पाटील, भाजपचे दिग्गज नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, सलग पाच वेळेस निवडून आलेले मोहन रावले, शिवसेनेचे चार वेळा आमदार राहिलेले आणि पहिल्यांदाच लोकसभा लढविणारे गजानन किर्तीकर, सलग तीन वेळा लोकसभेवर जाणारे रामदास आठवले, किरीट सोमय्या, प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. भाजपच्या मनेका गांधी, केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम हे मात्र फेरमतमोजणीत विजयी ठरले.

महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार

महाराष्ट्राचे 48 विजयी उमेदवार

1.नंदूरबार(एसटी)-उ.महाराष्ट्र-माणिकराव गावित (CONG)

2.धुळे-उ.महाराष्ट्र-प्रतापराव सोनावणे (BJP)

3.जळगाव-उ.महाराष्ट्र-ए. टी पाटील (BJP)

4.रावेर-उ.महाराष्ट्र-हरिभाऊ जावळे (BJP)

5.बुलडाणा-विदर्भ-प्रतापराव जाधव (SHS)

6.अकोला-विदर्भ-संजय धोत्रे (BJP)

7.अमरावती(एससी)-विदर्भ-आनंदराव आडसूळ (SHS)

8.वर्धा-विदर्भ-दत्ता मेघे (CONG)

9.रामटेक(एससी)-विदर्भ-मुकूल वासनिक (CONG)

10.नागपूर-विदर्भ-विलास मुत्तेमवार (CONG)

11.भंडारा-गोंदिया-विदर्भ-प्रफुल्ल पटेल (NCP)

12.गडचिरोली-चिमूर-विदर्भ-मारोतराव कोवासे (CONG)

13.चंद्रपूर-विदर्भ-हंसराज अहिर (BJP)

14.यवतमाळ-वाशिम-विदर्भ-भावना गवळी (SHS)

15.हिंगोली-मराठवाडा-सुभाष वानखेडे (SHS)

16.नांदेड-मराठवाडा-भास्करराव पाटील-खतगावकर(CONG)

17.परभणी-मराठवाडा-गणेश दूधगावकर (SHS)

18.जालना-मराठवाडा-रावसाहेब दानवे (BJP)

19.औरंगाबाद-मराठवाडा-चंद्रकांत खैरे (SHS)

20.दिंडोरी(एसटी)-उ.महाराष्ट्र-हरिश्चंद्र चव्हाण (BJP)

21.नाशिक-उ.महाराष्ट्र-समीर भुजबळ (NCP)

22.पालघर(एसटी)-कोकण-उ.महाराष्ट्र-बळीराम जाधव(बहुजन विकास)

23.भिवंडी-कोकण-सुरेश तावरे (CONG)

24.कल्याण-कोकण-आनंद परांजपे (SHS)

25.ठाणे-कोकण-संजीव नाईक (NCP)

26.मुंबई उत्तर-मुंबई-संजय निरूपम (CONG)

27.मुंबई वायव्य-मुंबई-गुरूदास कामत (CONG)

28.मुंबई ईशान्य-मुंबई-संजय दिना पाटील (NCP)

29.मुंबई-उत्तर-मध्य-मुंबई-प्रिया दत्त (CONG)

30.मुंबई-दक्षिण-मध्य-मुंबई-एकनाथ गायकवाड (CONG)

31.मुंबई दक्षिण-मुंबई-मिलिंद देवरा (CONG)

32.रायगड-कोकण-अनंत गिते (SHS)

33.मावळ-प.महाराष्ट्र-गजानन बाबर (SHS)

34.पुणे-प.महाराष्ट्र-सुरेश कलमाडी (CONG)

35.बारामती-प.महाराष्ट्र-सुप्रिया सुळे (NCP)

36.शिरूर-प.महाराष्ट्र-शिवाजीराव आढळराव (SHS)

37.अहमदनगर-प.महाराष्ट्र-दिलीप गांधी (BJP)

38.शिर्डी(एससी)-प.महाराष्ट्र-भाऊसाहेब वाकचौरे (SHS)

39.बीड-मराठवाडा-गोपीनाथ मुंडे (BJP)

40.उस्मानाबाद-प.महाराष्ट्र-मराठवाडा-पद्मसिंह पाटील (NCP)

41.लातूर(एससी)-मराठवाडा-जयवंतराव आवळे (CONG)

42.सोलापूर(एससी)-प.महाराष्ट्र-सुशीलकुमार शिंदे (CONG)

43.माढा-प.महाराष्ट्र-शरद पवार (NCP)

44.सांगली-प.महाराष्ट्र-प्रतिक पाटील (CONG)

45.सातारा-प.महाराष्ट्र-छ.उदयन राजे भोसले (NCP)

46.रत्नागिरी-सिंधुदुर्ग-कोकण-निलेश राणे (CONG)

47.कोल्हापूर-प.महाराष्ट्र-सदाशिवराव मंडलिक-स्वा.शे.सं

48.हातकणंगले-प.महाराष्ट्र-राजू शेट्टी - स्वा.शे.सं

केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पराभूत


हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सुभाष वानखेडे विजयी झाले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा धक्कादायक पराभव केला आहे.

राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पराभव पत्कारावा लागला आहे. सूर्यकांता पाटील 1991 साली नांदेडमधून आणि 1998 साली हिंगोलीतून निवडून आल्या होत्या. एका निवडणुकीत विजय आणि त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव ही परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे हे विशेष.

भाजपाच्या किरीट सोमैय्यांचा धक्कादायक पराभव

मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल लागला आहे. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातुन भाजपाच्या किरीट सोमैय्यांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांनी त्यांचा पाच हजार मतांनी पराभव केला आहे. मुंबई उत्तर पूर्व मध्ये तिरंगी लढतीत संजय पाटील यांना 2,15,000, किरीट सौमैय्यांना 2,10,000 तर मनसेचे शिशिर शिंदे यांना 1,94,000 मतं मिळाली आहेत. शिंदे यांनी सौमैय्यांच्या पराभवाला हातभार लावल्याचं दिसून येतयं.

राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हादरा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडलं आहे. कोल्हापूरमध्ये अपक्ष बंडखोर सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा धक्कादायक पराभव केला आहे. आजवर लोकसभेच्या निवडणुकीत कधीही पराभूत न होण्याची परंपरा मंडलिक यांनी राखली आहे.
राजकीय कारकिर्दीत कधीही मागे हटायचं नाही हे मंडलीकांचे स्वभाव वैशिष्ठ्ये त्याला अनुसरून मंडलीकांनी थेट शरद पवारांना आव्हान दिलं. मंडलिकांच्या झंझावाता समोर एक प्रकारे पवारांचाच पराभव झाला आहे.
हातकणंगलेतही निवेदिता माने पराभूत झाल्या आहेत. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला आहे हे निश्चित.

सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त विजयी, राम नाईक पराभूत



सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे शरद बनसोडे यांचा पराभव केला आहे. माकपचे आमदार नरसय्या आडम यांनी बसपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिंदे अ़डचणीत आले होते.

पण शिंदे यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला आहे. बसपाच्या तिकिटावर लढतीत असलेले इब्राहीम भाईजान यांच्या झंझावती प्रचाराने मतविभागणी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्याचा फटका प्रिया दत्त यांना बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अखेरीस प्रिया दत्त विजयी झाल्या.

मुंबईतील दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. भाजपाचे दिग्गज उमेदवार राम नाईक यांना मुंबई उत्तर मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसचे संजय निरुपम यांनी नाईकांचा पराभव केला आहे. मनसेच्या शिरीष पारकर यांनी नाईकांच्या पराभवाला हातभार लावला.

दत्ता मेघे, प्रफुल पटेल विजयी तर अंतुले पराभूत


वर्ध्यातून काँग्रेसचे दत्ता मेघे विजयी झाले आहेत त्यांनी भाजपाच्या सुरेश वाघमारे यांचा पराभव केला आहे. या आधी मेघे 1991 साली नागपूर, 1996 साली रामटेक आणि 1998 साली वर्ध्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. सलग तीन लोकसभा निवडणुका तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांना २००४ साली निसटत्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. भंडार-गोंदियात काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोल यांनी बंडखोरी केल्याने प्रफुल पटेल यांना मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण पटेल यांनी तिरंगी लढतीत अखेर बाजी मारली. भाजपाचे विद्यमान खासदार शिशूपाल पटले यांना पराभव पत्करावा लागला आहे.रायगडमध्ये काँग्रेसचे विद्यमान खासदार ए.आर.अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांच्या कडून पराभव पत्करावा लागला आहे. रायगडमध्ये अलिबागचे काँग्रेस आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे अंतुलेंच्या कार्यपध्दतीबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजीही होती.

काँग्रेसने मानले आभार, भाजपला कौल मान्य


पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशाच्या जनतेचे आभार मानले आहेत. तर भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचही अरूण जेटली यांनी मान्य केलं आहे. देशाचा निर्णय आम्हाला मान्य असल्याचं अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे विजयी


रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघातून डॉ.निलेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातुन सुरेश प्रभू सलग चार वेळा निवडून आले होते. या मतदारसंघात बसपाचे जयेंद्र परुळेकर आणि काँग्रेस बंडखोर अकबर खलिफे हेही रिंगणात होते.

नारायण राणे यांच्या नात्यातील अंकुश राणे यांचे अपहरण आणि खुनामुळे या मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झालं होत. नारायण राणे यांनी या संदर्भात सेनेच्या संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावर आरोप केले होते.

राष्ट्रवादीचा निलेश राणे यांना विरोध होता पण नारायण राणेंनी यांनी आपलं सर्वस्व पणाला लावत आपले चिरंजीव निलेश राणे यांना निवडून आणलं आहे.

समीर भुजबळ अटीतटीच्या लढतीत विजयी

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांनी अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणली आहे. मनसेचे हेमंत गोडसे यांनी त्यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं होतं. जातीयवादी प्रचाराने नाशिक ढवळून निघालं होतं. मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान करा असा उघड प्रचार झाल्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जातीने लक्ष घातलं होतं.

प्रचारादरम्यान छगन भुजबळ हळवे झाले होते त्यांनी मतदारांना समीर भुजबळ यांना निवडून देण्याकरता भावनिक आव्हान केलं होते.

शिवसेनेचे दत्ता गायकवाड, मनसेचे हेमंत गोडसे हे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे तर बसपाचे उमेदवार सुधारदास महंत हे ब्राह्मण समाजाचे उमेदवार रिंगणात असल्याने सर्वांचेच लक्ष नाशिकने वेधून घेतलं होतं.

मनसेच्या आंदोलनाला नाशिकमध्ये चांगला प्रतीसाद लाभला होता त्यामुळे या मतदारसंघात मनसेला विजयाच्या आशा होत्या. पण समीर भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या पदापर्णाच्या लढतीत विजय प्राप्त केला आहे.

महाराष्ट्रात भाजपाकडे दोन जागा


जळगाव मधून भाजपाचे ए.टी.पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांचा पराभव केला आहे. जळगावातून राष्ट्रवादी संपवण्याची भाषा करणाऱ्या सुरेशदादा जैन यांनी मोरे यांच्या पराभवाला हातभार लावला आहे. राष्ट्रवादीचे मोरे लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.

जालना लोकसभा मतदारसंघातुन रावसाहेब दानवे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे यांचा पराभव केला आहे.

शिवसेनेने तीन जागा जिंकल्या


महाराष्ट्रातील बहुतेक जागांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. त्यापैकी शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. परांजपे यांचा सलग दुसरा विजय तर डावखरे यांचा सलग तिसरा पराभव.

शिरुरमध्येही शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराभव केला आहे.

शिर्डीतही भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांचा पराभव केला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे सुरेश टावरे विजयी झाले आहेत. भिवंडीत पंचरंगी लढतीत भाजपाचे जगन्नाथ पाटील, मनसेचे डी.के.म्हात्रे, सपाचे आर.आर.पाटील, अपक्ष विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला.

काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा

काँग्रसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा असं राष्ट्रवादी काँग्रेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. यूपीए 252 जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीए 158 जागांवर तसेच तिसऱी आघाडी 88 , चौथी 28 जागांवर आघाडीवर आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आहेत. काँग्रेसची 14 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेसचे माणिकराव गावित नंदूरबार मधून नवव्या वेळेस विजयी झाले आहेत.

माणिकराव गावितांचा अभूतपूर्व विक्रम

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव गावित यांनी सलग नव्यांदा विजय मिळवला आहे. गावित १९८१ साली पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर ते एकदाही पराभूत झाले नाहीत.

यावेळेस माणिकराव गावितांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांचे भाऊ शरद गावीत यांना समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे गावित आणि गावित यांच्या लढतीत मतविभागणीचा फायदा भाजपाच्या सुहास नटवदकरांना मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण हे सर्व आडाखे फोल ठरवत माणिकरावांनी विजयी परंपरा कायम राखली.

पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी

महाराष्ट्रात दुसरा निकाल पालघर लोकसभा मतदारसंघाचा जाहीर झाला असून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव विजयी झाले आहेत. या मतदारसंघात चौरंगी लढत होती. काँग्रेसचे दिग्गज उमेदवार दामु शिंगडा, भाजपाचे चिंतामण वणगा आणि माकपचे लहानु कोम यांना आस्मान दाखवत जाधवांनी विजय संपादन केला.

त्या आधी महाराष्ट्रात पहिला निकाल सातारचा होता.. सातारा लोकसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे भोसले विजयी झाले आहेत. उदयनराजे भोसले यांना 5,32,583 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी पुरुषोत्तम जाधव यांना 2,35,068 मतं मिळाली. जवळपास 85,000 मताधिक्क्याने ऊदयनराजे विजयी झाले आहेत

शुक्रवार, १५ मे, २००९

राहुल का जादू चल गया...


राहुलबाबा का मॅजिक उत्तरप्रदेश में चल गया है. राहुल गांधींच्या झंझावती प्रचारामुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसने धक्कादायक आघाडी घेतली आहे. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसला कायम मार खावा लागत होता. पण राहुल गांधींच्या करिष्म्यामुळे काँग्रेस उत्तरप्रदेशात परत एकदा धावू लागला आहे.
पहिल्या तीन तासांच्या मोजणीत काँग्रेस वीस मतदासंघात आघाडीवर आहे. गेल्या काही दशकातली ही काँग्रेसची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे.
समाजवादी पक्षही २० ठिकाणी आघाडीवर आहे. बहुजन समाज पार्टीने ४० ते ५० जागा जिंकण्याचा दावा केला होता. बसपा २१ जागांवर आघाडीवर आहे. भाजपा फक्त १५ जागांवर आघाडीवर आहे. अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोक दल फक्त दोन जागा आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश मधील मतदार राष्ट्रीय पक्षांकडे झुकू लागल्याचं चित्र दिसत आहे. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.

छ उदयनराजे भोसले विजयी

साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले विजयी
महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत.
आघाडीवर असलेले उमेदवार पुढीलप्रमाणे
ठाणे- संजीव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस
पालघर- बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी
कल्याण- आनंद परांजपे शिवसेना
भिवंडी- सुरेश टावरे काँग्रेस
दक्षिण मुंबई- मिलिंद देवरा काँग्रेस
दक्षिण मध्य मुंबई- सुरेश गंभीर शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व- प्रिया दत्त काँग्रेस
सांगली- प्रतीक पाटील काँग्रेस
जळगाव- ए.टी.पाटील
मुंबई उत्तर पश्चिम- गुरुदास कामत काँग्रेस
मुंबई उत्तर- संजय निरुपम काँग्रेस
मुंबई उत्तर पूर्व- संजय पाटील राष्ट्रवादी
औरंगाबाद- उत्तमसिंग पवार काँग्रेस
नंदुरबार- माणिकराव गावित काँग्रेस
लातूर- जयवंतराव आवळे काँग्रेस
नांदेड- भास्करराव पाटील खतगावकर काँग्रेस
अकोला- संजय धोत्रे भाजपा
शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना
नागपूर- विलासराव मुत्तेमवार काँग्रेस
मावळ- गजानन बाबर शिवसेना
परभणी- गणेशराव दुधगावकर शिवसेना
चंद्रूपर- हंसराज अहिर भाजपा
बुलडाणा- डॉ. राजेंद्र शिंगणे राष्ट्रवादी
बारामती- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी
हातकणंगले- राजू शेट्टी शेतकरी संघटना
धुळे- अमरिश पटेल काँग्रेस
कोल्हापूर- सदाशिवराव मंडलीक अपक्ष
उस्मानाबाद- पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी
दिंडोरी- हरिश्चंद्र चव्हाण भाजपा
बीड- गोपीनाथ मुंडे भाजपा
अमरावती- आनंदराव अडसूळ शिवसेना
गडचिरोली- अशोक नेते भाजपा
रामटेक- मुकुल वासनिक

निवडणुकीची इंटरेस्टिंग माहिती

माणिकराव गावित लोकसभा निवडणुकीत सलग नवव्यांदा विजयी माणिकराव गावितांचा विक्रम

दत्ता मेघेंची अनोखी हॅटट्रिक
१९९१ साली नागपूर, १९९६ रामटेक, १९९८ वर्धा
अशा सलग तीन लोकसभा निवडणुकांत तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून विजय

२००४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकानंतर महाराष्ट्रात सहा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका

ठाणे, सांगली, जळगाव, एरंडोल, रामटेक, मुंबई उत्तर-मध्य

विलास मुत्तेमवार पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले होते. आजवर एकदाच १९९६ मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले होते. आजपर्यंत सहा वेळा लोकसभेवर

दामू शिंगडा पहिल्यांदा १९८० साली लोकसभेवर निवडून गेले तेही पहिल्यांदा १९९६ साली पराभूत झाले होते. पाच वेळा लोकसभेवर

ए.आर.अंतुले लोकसभेच्या चार निवडणुका १९८९, १९९१ आणि १९९६ सलग तीन वेळा आणि २००४ साली विजयी.
तीन वेळा पराभूत १९८४, १९९८, १९९९ साली औरंगाबादमध्ये

सदाशिवराव मंडलिक १९९८, १९९९, २००४ तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी

गुरुदास कामत १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ चार वेळा विजयी
१९८९,१९९६ आणि १९९९ तीन वेळा पराभूत

सुरेश कलमाडी १९९६ आणि २००४ साली विजयी

प्रफुल्ल पटेल १९९१, १९९६ आणि १९९८ साली विजयी
१९९९ आणि २००४ साली पराभूत

अनंत गिते १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ साली सलग चार वेळा विजय

मोहन रावले १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ सलग पाचव्यांदा लोकसभेवर

राज्यातील पक्षस्थिती- सकाळी ११







शरद पवारांना पंतप्रधान बनवायचंय

आम्हाला शरद पवारांना पंतप्रधान बनवायचंय, मात्र वास्तवाचही आम्हाला भान आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत सांगितलं.तसेच आम्ही सरकार बनवलं तर ते धर्मनिरपेक्ष सरकार बनवू असं पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच आपण शिवसेनेच्या संपर्कात आहात का? असं विचारल्यावर त्यांनी आपण शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत ही माहिती दिली.

गुरुवार, १४ मे, २००९

सोनिया गांधी शरद पवारांमध्ये चर्चा

निवडणुकांचे निकाल आता अवघ्या काही तासांनी लागणार आहेत. सरकार स्थापनेच्या दृष्टीने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल रात्री सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीत सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतं.

सोनिया गांधींनी काल राष्ट्रीय जनता दलाचे लालु प्रसाद यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्याशी फोनवर चर्चा केली.

युपीए आणि एनडीए यांना जवळपास सारख्याच जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने बहुमताच्या दृष्टीने एक एक जागा महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही आघाड्यांनी राजकीय पक्षांना आपल्याकडे खेचण्याचे सर्व प्रयत्न सूरु केले आहेत.
काल रात्री मुकेश अंबानींनी प्रफुल पटेल यांच्या समवेत शरद पवार यांची भेट घेतल्याने राजधानीत तर्कवितर्कांना उधाण आलं होतं.

वरुण गांधींवरचा रासुका हटवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


वरूण गांधींवर उत्तर प्रदेश सरकारने लावलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा हटविण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. पिलीभीतमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी मायावती सरकारने वरूण गांधीं यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई केली होती. त्याविरोधात वरूण गांधी यांनी सु्प्रीम कोर्टात धाव घेतली होती त्यावर निर्णय़ देताना आज सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे. या निर्णयानंतर उत्तर प्रदेश सरकारने या आधी काढलेला वरूण गांधींविरूद्ध स्थानबद्ध करण्याचा आदेश मागे त्यांना घ्यावा लागणार आहे. वरूण गांधी हे उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

राज ठाकरे स्थानिक दहशतवादी - राम जेठमलानी


देशाबाहेरच्या दहशतवाद्यांपेक्षा देशातल्या दहशतवाद्यांवर आधी कारवाई करा. राज ठाकरे हे देखील त्याच दहशतवाद्यांपैकी एक आहेत असं खळबळजनक वक्तव्य प्रख्यात कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी पुण्यात केलंय. स्टार माझा आणि पुणे पोलिसांच्या वतीनं आजोयित केलेल्या दहशतवाद आणि भारतासमोरील आव्हाने या परिसंवादात राम जेठमलानी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बुधवार, १३ मे, २००९

मंगळवार, १२ मे, २००९

शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज


शेवटच्या टप्प्यातलं मतदान सुरु झालंय आणि अॅक्टरपासून क्रिकेटरपर्यंत सर्वजण मतदानाला पोहोचताहेत. आज सकाळी माजी क्रिकेटर आणि अमृतसरमधले भाजपचे उमेदवार नवज्योतसिंह सिद्धू यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर आले फेमस साऊथ इंडियन स्टार कम पॉलिटिशियन रजनीकांत. त्यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अॅक्टर पाठोपाठ संगीतकार आणि ऑस्कर विनर ए आर रेहमान यांनी कुणाला जय हो म्हंटलं हे त्यांनाच माहित. पण आज चेन्नईत त्यांनीही मतदान केलं.


शिवाय या मतदानात पॉलिटीशियनही मागे नाहीत भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला.समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज रामपुरात आपल्या मतदानाचा ह्कक बजावला. जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर इथून निवडणूक रिंगणात आहेत.
तर दुसरीकडे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एडीएमकेच्या नेत्या अम्मा जयललिता यांनीही आज चेन्नईत मतदान केलं.

देशात ७ राज्यात मतदान

लोकसभेच्या शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातलं मतदानाला सुरुवात झालीये. आजच्या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या 86 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीये. जम्मूतल्या 2 आणि हिमाचल प्रदेशातल्या 4 जागांवर तर पंजाबमधल्या 9 आणी चंदिगडमधल्या एका जागेवर मतदानाला सुरुवात झालीये. तर उत्तर प्रदेशातल्या 14 जागांवर तसंच उत्तराखंडच्या 5 जागांवर मतदान होतंय. दक्षिणेकडे तामिळनाडूच्या 39 जागांवर तर पाँडेच्चरीच्या एका जागेवर मतदान होतंय. पूर्वेकडे बंगालमध्ये 11 जागांवर मतदार आपला हक्क बजावताहेत.

बुधवार, ६ मे, २००९

गांधी घराण्याने बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात गुरुवारी गांधी घराण्याचंही मतदान होतं. आधी प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वधेरासोबत दिल्लीत मतदान केलं. त्यानंतर काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या सोबत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्या. आणि त्यानंतर पोहोचले गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधी. त्यांच्या मतदानाला समर्थकांनी इतकी गर्दी केली होती की मतदान करताच त्यांना तिथून सुरक्षेच्या कारणास्तव काढता पाय घ्यावा लागला

मंगळवार, ५ मे, २००९

काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देईल - राहुल गांधी

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ,"काँग्रेस डाव्यांना पाठिंबा देतील जर डावे 190 जागा मिळवण्यात यशस्वी झाले तर!" असे वक्तव्य केले.
जर डाव्यांनी 180 ते 190 जागा मिळवल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.जर असं झालं तर त्यांना पाठिंबा देणारा मी पहिला असेन,असं राहुल गांधी यांनी दिल्लीत अशोका हॉटेल येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं.
काँग्रेस आणि डावे यांच्या तत्वप्रणालीत फरक आहे.पण तरिही काही गोष्टींमध्ये साम्य आहे,असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींनी असाही आत्मविश्वास व्यक्त केला की डावे मनमोहन सिंग यांना पंतप्रधान म्हणून मान्य करतील.मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत आणि मनमोहन सिंग यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे.
अडवाणी यांच्या स्विस बँकेवरील टिप्पणीबाबत राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं- मी अडवाणींच्या वक्तव्याबाबत पूर्णपणे सहमत आहे.स्विस बँकेत 60 वर्षांपासून भारताचे पैसे आहेत.आपण सर्वांनी मिळूनच ते पैसे सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यासाठी एकत्र आले पाहिजे.ह्या प्रश्नाबाबत फक्त चर्चा करण्याऐवजी तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस

चौथ्या टप्प्यातल्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे उमेदवार आज पूर्ण ताकदीनं प्रचार करतील. देशभरात चौथ्या टप्प्यात 85 जागांसाठी, सात तारखेला मतदान होतंय. त्याचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपेल. जम्मू काश्मीर, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये सात तारखेला मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर, पंजाबमधल्या 4 जागांसाठी, हरियाणातल्या 10 जागांसाठी, राजस्थानातल्या 25 जागांसाठी, दिल्लीतल्या 7 जागांसाठी , उत्तर प्रदेशातल्या 18 जागांसाठी, बिहारमधल्या 3 आणि पश्चिम बंगालमधल्या 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

मुंबईत कलिना आणि कुर्ल्यात मतदान

मुंबईतल्या कलिना इथल्या 183, 185 आणि कुर्ल्यातल्या 229ए आणि 232 क्रमांकाच्या केंद्रावर आज फेरमतदान होतंय. या मतदानकेंद्रांवर 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे याठिकाणी फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय. त्यानुसार आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसत नाही. तसंही, फेरमतदानाला फार प्रतिसाद मिळत नसल्याचाच पूर्वानुभव आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आजही होणार असे दिसते. ऑफिसला सुटी नाही, मतदानाचं वातावरण नाही, कार्यकर्त्यांमध्येही फारसा उत्साह नाही आणि उमेदवारही कुठे दिसत नाहीत. त्यामुळे किती जण मतदानाला उतरतील, याबद्दल साशंकताच आहे. हे चित्र पाहता, मुंबईतल्या मतदानाची टक्केवारी आणखी किंचितशी घसरणार, असं दिसतंय.

शुक्रवार, १ मे, २००९

वरूण गांधींना दिलासा

भाजपा नेते वरूण गांधी यांना दिलासा मिळालाय. पॅरोलवर सुटलेल्या वरूण गांधी यांच्याविषयीची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं केली. वरूण गांधी हे १४ मे पर्यंत जेलबाहेर राहू शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयांनं दिलाय. पिलिभीत मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १३ मे ला मतदान होणार आहे. आणि न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार वरूण गांधी यांना १४ मेपर्यंत जेलच्या बाहेर राहण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं आज दिलेल्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिलिभीतच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला होता. वरूण यांनी या प्रकारानंतर सरेंडरही केलं होतं, तसंच पुन्हा अशा प्रकारचं प्रक्षोभक भाषण करणार नाही असा, विश्वास दर्शवणारं पत्रही न्यायालयाला दिलं होतं.

गुरुवार, ३० एप्रिल, २००९

सोमवार, २७ एप्रिल, २००९

पाहा शरद पवार यांची दणदणीत मुलाखत

विजय चौगुलेंचं राज ठाकरे यांना खुलं आव्हान

मनसेचा महेश जेठमलानींवर आरोप


ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी काल राज ठाकरेंवर भडकले. जेठमलानी हे अफजल गुरूची वकिली करत असल्याचा आरोप राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत असल्यानं जेठमलानींनी राज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची घोषणा केली. जेठमलानी यांनी यासंदर्भात राज ठाकरेंना नोटीस पाठवून राज ठाकरे यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे हे एक बेजबाबदार नेते आहेत, असे वक्तव्य त्यांनी स्टार माझाशी बोलताना केलेच. पण त्याचबरोबर, माझ्यावर खोटेनाटे आरोप करणं राज ठाकरे यांना महागात पडेल, असा इशारा द्यायलाही ते विसरले नाहीत.
भाजप शिवसेनेचे राज्यसभेतले माजी खासदार राम जेठमलानी यांनी राज ठाकरेंवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. उत्तर मध्य मुंबईतले भाजपचे उमेदवार महेश जेठमलानी यांच्या विरूद्ध,
मुंबई उपनगराचे निवडणूक अधिकारी विश्वास पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे., धर्माचा आधार घेऊन प्रचार केल्याचा आरोप महेश जेठमलानी यांच्यावर करण्यात आला आहे. त्यासाठी पुरावा म्हणून महेश जेठमलानींचे वडिल राम जेठमलानी यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या ख्रिश्चन मतदारांना उद्देशून लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे

प.बंगालमध्ये डावे हुकूमशाही राबवत असल्याचा सोनियांचा आरोप



काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी आज पश्चिम बंगालमधल्या प्रचार सभेत डाव्या आघाडीवर हल्लाबो केला. डावी आघाडी पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही राबवत आहे, आणि त्यामुळे तिथे गरीब आणि अल्पसंख्याकांचा विकास होऊ शकलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या एका दुर्गम खेड्यातल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. डाव्या आघाडीच्या अनास्थेमुळेच पश्चिम बंगालमधल्या लाखो गरीबांना राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड मिळू शकली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला एकमेव मुस्लीम बहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या प्रचारसभेत सोनिया गांधींनी यूपीए सरकारने अल्पसंख्याकांसाठी केलेल्या प्रचारसभेचा पाढा वाचला. सिंगूर आणि नंदिग्राम मधल्या हिंसाचाराचा उल्लेख करत त्यांनी डाव्या आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली. डाव्या आघाडीचे नेते स्वतःला गरीब, शेतकरी आणि कामगार वर्गाचे वाली म्हणवून घेतात, मात्र स्वतःच्याच जमीनीचं रक्षण करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करतात, या लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन जमिनीवर उतरणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना लाठीचा मार खावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्शिदाबादच्याच जांगीपूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही आपल्या भाषणात डाव्या आघाडीवर लोकशाहीच्या नावावर हुकूमशाही राबवत असल्याचा आरोप केला. या जाहीर सभेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचंही भाषण झालं. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची पश्चिम बंगालमध्ये युती आहे. गेल्या 30 पेक्षा जास्त वर्षाहून राज्यात डावी आघाडी सत्तेत आहे, या 30 वर्षांच्या काळातही डाव्या आघाडीला राज्यातल्या गरीब आणि अल्पसंख्यांकाचे प्रश्न सोडवता आले नाहीत. आपल्या 12 मिनिटांच्या हिंदी भाषणातून सोनिया गांधींनी राज्यातल्या डाव्या आघाडीवर कडाडून टीका करतानाच केंद्र सरकारने पश्चिम बंगालसाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. डाव्या आघाडीने केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची राज्यात अंमलबजावणी करताना फक्त नेत्यांचाच विचार केला, सामान्य लोकांचा नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु झालं आहे. देशभरातील एकशे एक्केचाळीस मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर राज्यातील पंचवीस मतदारसंघातही आज मतदान होत आहे. या पंचवीस मतदारसंघामधून राज्यातील तसचं केंद्रातील दिग्गज नेतेही निवडणूक लढवताहेत. त्यामुळे आज या दिग्गज नेत्यांचही भवितव्य इलेक्ट्रॉनिक मशीन्समध्ये बंद होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बुधवार, २२ एप्रिल, २००९

देशभरातल्या प्रमुख लढती

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या होत आहे. राजकारणातील अनेक रथीमहारथींचे भवितव्य पणाला लागलेलं आहे. उद्या मतदारराजा आपला कौल देईल. देशभरातल्या प्रमुख लढतींमध्ये आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे भाऊ वाय.एस.जगमोहन रेड्डी हे कडापामधून रिंगणात आहे. कर्नाटकात दक्षिण बंगलोरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अनंत कुमार लढतीत आहेत तर बंगलोर ग्रामीण मध्ये भूतपूर्व पंतप्रधान देवेगौडा यांचे चिंरजीव एच.डी.कुमारस्वामी आपलं नशीब आजमावत आहेत त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या तेजस्वीनी गौडा. गुलबर्गात काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जून खर्गे निवडणूक लढवत आहेत. तर बंगलोर उत्तर मध्ये काँग्रेसचे वयोवृध्द नेते माजी रेल्वे मंत्री सी.के.जाफर शरीफ, उत्तर कन्नाडात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा आणि भाजपाचे अनंतकुमार हेगडे यांच्यात लढत आहे. अल्वांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या मुलांना तिकिट न दिल्याने हायकमांडवर टीका केली होती.
उत्तर प्रदेशात अमेठीत राहुल गांधी आणि भाजपाचे आर.बी.सिंग यांच्यात सामना आहे. तर आंबेडकर नगरमध्ये भाजपाचे विनय कटियार मतदारांना सामोरं जात आहेत. प्रतापगड मध्ये तिरंगी लढतीत अपना दलाचे आतिक अहमद, काँग्रेसच्या राणी रत्ना सिंग आणि सपाचे अक्षय प्रताप सिंग आपलं नशीब आजमावत आहेत.
बिहारमध्ये हाजीपूर मध्ये रामविलास पासवान, मुझफ्फरपूर मध्ये साथी जॉर्ज फर्नांडीस आपल्या आयुष्यातली अखेरची निवडणूक लढवत आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी फर्नांडीसांचे शिष्य त्यांना सोडून गेल्याने एकाकी लढत देण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपलीय. वैशालीत केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंग, मधूबनीत केंद्रीय गृह राज्य मंत्री शकील अहमद आणि भाजपाच्या हुकुमदेव नारायण यादव यांच्यात लढत आहे. पश्चिम चंपारणमध्ये लोक जनशक्तीच्या तिकिटावर सिने दिग्दर्शक प्रकाश झा आणि राजदचे साधु यादव यांच्यात प्रेक्षणीय लढत आहे.
मध्यप्रदेशातही अनेक दिग्गज उद्या मतदारांना सामोरे जातील त्यात छिंदवाड्यात कमलनाथ, रिवात भाजपाचे चंद्रमणी त्रिपाठी आणि सिधीत अर्जून सिंग यांच्या कन्या बंडखोर उमेदवार वीणा सिंग लढतीत आहेत.
झारखंडमध्ये जमशेदपूरमध्ये अर्जून मूंडा आणि शैलेंद्र माहतो यांच्यात सामना आहे. दुमरात शिबू सोरेन आपलं नशीब आहेत. सोरेन विधानसभेच्या पोटनिवडणूकीत पराभूत झाल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होत. सिंगभूममधून माजी मुख्यमंत्री मधू कोडा निवडणूक लढवत आहेत.

सोमवार, २० एप्रिल, २००९

आजची फेकाफेकी

प्रचाराच्या तोफा..

दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. राज्यातील पंचवीस लोकसभा मतदारसंघात तेवीस तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळं या पंचवीस मतदारसंघातील
जाहीर प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानात राज्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, दिंडोरी, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, रावेर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बारामती, पुणे, मावळ, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
निवडणूकीच्या या टप्प्यात शरद पवार, ए आर अंतुले, सुप्रिया सुळे, सुरेश कलमाडी. समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुरेश प्रभु रामदास आठवले या दिग्गजांच भवितव्य ठरणार आहे.
त्यामुळं या मतदारसंघातील प्रचाराची राळ आज थांबणार आहे. राज्य आणि केंद्रातील अनेक दिग्गज नेते या मतदारसंघातून निवडणूक लढवताहेत.

रविवार, १९ एप्रिल, २००९

कसाबचं रेशनकार्ड राज ठाकरेंच्या सभेत

राहुल पंढरपुरात तर पवार सांगोल्यात


राजकारणातलं वजन सभेत गर्दी खेचण्यासाठी किती उपयोगाचं पडतं हे आज सोलापुरात पहायला मिळालं. सोलापूर जिल्हयात आज दोन दिग्गजांच्या सभा आहेत. काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांची आज पंढरपुरात तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सभा सांगोल्यात आहे. पण पवारांच्या सभेत जनसागर लोटल्याचं दिसतंय. पण पंढरपुरात मात्र चित्र वेगळंच आहे. राहुल गांधी यांच्या सभेला मात्र हजारभरही लोक नाहीत. एक तर टळटळीत दुपारची वेळ आणि राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी घेतलेली खबरदारी. पंढरपुरातल्या सभेतल्या लोकांकडून पोलिसांनी ओळखपत्र मागितली. त्यामुळे झालं असं की लोक या सभेला थांबलेच नाहीत. त्या उलट पवारांच्या सभेला मात्र तुफान गर्दी झालीये.

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

आजची 'फेकाफेकी'

एका मताचं मोल

भारतातल्या कोट्यावधी मतदारांपैकी सर्वात भाग्यवान मतदार जर कोण असेल तर ते आहेत भारतदास दर्शनदास त्याला कारणही तसचं आहे कारण त्यांना मतदानासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाहीये. त्यांच्या एकट्यासाठी स्वतंत्र मतदानाची सोय करण्यात आलीयं. पुजारी असलेले भारतदास दर्शनदास हे गुजरातच्या अतीदुर्गम भागातील गीरच्या वाघांच्या अभयअरण्यात वास्तव्य करतात. त्यांना मतदान करता यावं याकरता तब्बल तीन निवडणूक अधिकारी आणि दोन पोलीस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसह रवाना होणार आहेत. त्याकरता त्यांना नदी आणि वाळवंट पार करण्याचं दिव्य करावं लागणार आहे. गेली एक दशक ते जंगलातल्या एका छोट्या मंदिरात वास्तव्य करत आहेत. तिथे विजेची तसचं पाण्याची आणि आरोग्य सूविधा नसल्याबाबत त्यांची तक्रार आहे. ते म्हणतात जवळच्या गावात पोहचायला त्यांना तब्बल दोन तास पायपीट करावी लागते. काही वेळा त्यांच्या घराबाहेर वाघ येऊन मुक्काम ठोकतात अशावेळेस ते जाईपर्यंत प्रतिक्षा करावी लागते असंही त्यांनी सांगितलं. गिर अभयाअरण्यातील मंदिराला भेट देणाऱ्या भक्तांच्या दानावर ते आपला उदरनिर्वाह करतात. गिरचं अभयअरण्य १४०० स्केवअर मीटर प्रदेशावर पसरलेलं आहे. या संरक्षित जंगलात वास्तव्य करणारे मालधारी आदिवासी त्यांना खायला देतात. पण त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत वाद असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. मालधारी आदिवासींच्या मुलांना धार्मिक ग्रंथांतील शिकवण देतात. रेडिओवरील बातम्या ऐकून ते देशातील घडामोडींची माहिती ठेवतात. माझ्या एका मताला फारशी किंमत नसल्यानेच आजवर कुणीही राजकारणी आपल्या भेटीस आलं नसल्याचं सांगताना देशाच्या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्या विषयीचा निर्धारही ते व्यक्त करतात.

अपडेट14 एप्रिल

* पहि्ल्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार संपला, 5 वाजेपासून प्रचार बंद

* लालकृष्ण अडवाणी यांच्या हेलिकॉप्टरच्या पायलटवर पंढरपुरात गुन्हा दाखल
* ४ एप्रिलला झालेल्या सभेसाठी पोलिसांच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल

* मला बंदीवासात टाकण्यासाठी जेल अजून तरी अस्तित्वात नाही- नरेंद्र मोदींची कपिल सिब्बल यांच्या टीकेला उत्तर
* मोंदींनी काँग्रेसवर टीका करताना जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी – कपिल सिब्बल

मनमोहन-अडवाणी आमनेसामने


देशाचा कारभार आतापर्यंतच्या सर्वात कमकुवत पंतप्रधानांच्या हाती असल्याचं अडवाणींचं वक्तव्य पंतप्रधान मनमोहन सिंहांनीं चांगलचं मनाला लावून घेतलेलं दिसतंय.दिल्लीत डॉ बाबासाहेब आंबेकडरांच्या जयंती निमित्ताने आयोजित कारण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी भाजप आणि काँग्रेस दोघांचेही पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेले अडवाणी आणि मनमोहन सिंह एकाच मंचावर आले. पण सध्या त्या दोघांच्यात सुरू असेलल्या वाकयुद्धाचा परिणाम इतका गंभीर झालाय की अडवाणी आणि पंतप्रधान एकमेककडे बघणंही टाळलं. त्यानंतर अडवाणींनी केलेल्या अभिवादनानंतर पंतप्रधानानी तेही स्वीकारलं नाही. आता राजकारणात विशेषतः निवडणूकांच्या प्रचारात एकामेकांवर आरोप प्रत्यारोप होतच असतात. पण सध्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या या नेत्यांमध्ये वैयक्तिक स्तरावर जाऊन होत असलेल्या प्रचारामुळे राजकारण खरोखरोच दुषित झालं हेच या प्रसंगावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

सोमवार, १३ एप्रिल, २००९

अपडेट 13 एप्रिल

*राज ठाकरे यांची अहमदनगरमधील सिन्नरला जाहीर सभा
दहशतवादी संसदेच्या थोड्या आत घुसले असते तर देशाचे अनेक प्रश्न सुटले असते -राज ठाकरे

* घर के आखाडे मे हर कोई पहैलवान होता है, राज ठाकरे साहब पटना आकर बोलके दिखाये- शेखर सुमन यांची पटना साहिब येथे राज ठाकरे यांच्यावर टीका
* शेखर सुमन कोन आहे मी ओळखत नाही - शर्मिला ठाकरेंचे शेखर सुमन यांच्या टीकेला मुंबईत उत्तर

*हे काही पक्ष मराठी-मराठी करणारे आपल्या मुलांना शिकायला कॉन्व्हेंटमध्ये पाठवतात- शरद पवारांची टीका.

दादा मला एक वहिनी आण...

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी त्यांची बहिण प्रियांका गांधीही सरसावल्या आहेत. अमेठी मतदारसंघातल्या खेड्यापाड्यात जाऊन त्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. नागरिकांची आपुलकीनं विचारपूस करुन त्यांचे प्रश्न जाणून घेत, त्यांना राहुलभैय्याला मत देण्याचं आवाहन करतायत. नरेंद्र मोदींनी काँग्रेसला बुढिया असं हिणवल्यानंतर प्रियांकांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. नरेंद्र मोदी, अडवाणी हे स्वतला तरुण समजतात की काय..अशी खोचक टीकाही त्यांनी केली होती.
प्रचारासाठी आलेल्या प्रियंका गांधींनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरं दिली.पत्रकारांच्या एका प्रश्नावर राहुल गांधी हे एकदिवस देशाचे पंतप्रधान नक्की होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण त्याआधी तो नवरदेव झालेला पाहायला आवडेल असंही म्हटलं..

आजची 'फेकाफेकी'

बदलले प्रचाराचे फंडे

पंतप्रधानांचा भाजपावर घणाघाती हल्ला


पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दुबळे पंतप्रधान आहेत, अशी टीका करणा-या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज पंतप्रधानांनी शालजोडीतले टोले लगावले. भारताचा विकास करणा-या आणि भारतीयांना एकत्र ठेवू शकेल, अशा नेतृत्वाची देशाला गरज आहे. जाती, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणा-या आणि बुरसटलेली, जुनीपुरानी विचारधारा बाळगणा-या नेतृत्वाची गरज नाही, असा टोला डॉ. मनमोहन सिंग यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी पंतप्रधान डॉ. सिंग यांनी आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये उद्योगपती, बॉलिवूडशी संबंधित व्यक्ती तसेच विविध वर्गांच्या प्रतिनिधींची खास बैठक घेतली. त्यावेळी देशाचे नेतृत्व कसे असावे, याचा ताळेबंद पंतप्रधानांनी उलगडून दाखवला. भारताला प्रगतीपथावर नेणारे नेतृत्व देण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच आहे, असे सांगताना देशाच्या, मुलाबाळांच्या आणि नातवंडाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काँग्रेसला मत द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जगामध्ये सध्या नेमक्या काय घडामोडी चालू आहेत, याचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. भारतीयांमध्ये एकोपा निर्माण करु शकेल, असे नेतृत्व हवे आहे. जात, धर्म आणि प्रांताच्या नावावर भारतीयांमध्ये भेदाभेद करणारे आणि भारतीयांना भारतीयांविरुद्ध लढवणारे नेतृत्व नको. भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व देशाला हवे. कायम भूतकाळात वावरणारे नेतृत्व नको. बुरसटलेली, कालबाह्य विचारधारा असलेले नेतृत्व नको, अशा शब्दांत अडवाणींचा नामोल्लेख टाळून डॉ. सिंग यांनी आपणच पंतप्रधानपदासाठी परफेक्ट उमेदवार असल्याचे संकेत दिले.
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात भारताचा विकास दर ९ टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात तो जेमतेम ५.८ टक्क्यांच्या आसपास होता. काँग्रेसच्या सर्वांना सामावून घेण्याच्या धोरणामुळेच देशाची प्रगती होऊ शकली. याउलट भाजपच्या विभाजनवादी धोरणांमुळे विकासाचा वेग मंदावला, अशी तोफही पंतप्रधानांनी यावेळी डागली. आजमितीला आंतरराष्ट्रीय वर्तुळात भारताच्या शब्दाला मोठे महत्त्व आहे. महत्त्वाच्या मुद्यांवर भारताच्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाते. भविष्यामध्ये एक ना एक दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला निश्चित स्थान मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले.
मुंबईमध्ये येताना आपल्या मनात संमिश्र भावना असल्याचे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या दुःखात मी सहभागी आहे. मुंबईकरांनी मोठ्या धीराने या आपत्तीला तोंड दिले. मुंबई व महाराष्ट्राच्या या स्पिरीटला आपण सलाम करतो, असे सांगून दहशतवाद आणि अतिरेकीवाद हीच देशापुढील मुख्य आव्हाने आहेत. आपण सगळ्यांनी सामूहिक मुकाबला करुन दहशतवाद्यांचे फुटीर मनसुबे यशस्वी होऊ देता कामा नये. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे आणि ती क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
मुंबई हे ख-या अर्थाने जागतिक शहर आहे. मुंबई म्हणजे आधुनिक, प्रगतीशील भारताचे प्रतिक आहे. आधुनिक भारत घडवण्याची संधी जनतेला आम्हाला पाच वर्षांपूर्वी दिली. ते स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नाही. राष्ट्र उभारणीचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यावेळी केले.

रविवार, १२ एप्रिल, २००९

शनिवार, ११ एप्रिल, २००९

आजची 'फेकाफेकी'

अपडेट 11 एप्रिल


गजानन किर्तीकर यांचा अर्ज अखेर वैध
गजानन किर्तीकर उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे उमेदवार
किर्तीकरांच्या उमेदवारीला काँग्रेसचा होता आक्षेप.

तिकीटासाठी माजी आमदार झाडावर
तिकीटासाठी माजी आमदार प्रेमपाल यांचं झाडावर चढून आंदोलन
काँग्रेस कार्यालयासमोरच्या झाडावर चढून प्रेमपाल यांनी तिकीटाची मागणी केली.

शुक्रवार, १० एप्रिल, २००९

आजची "फेकाफेकी"

अपडेट १० एप्रिल

शिवसेनेचा वचननामा जाहीर
* भूमीपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या देणार
* शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमुक्त करू (सातबारा कोरा करू)
* राज्य वीज भारनियमन मुक्त करू

तुकाराम रेंगे-पाटील काँग्रेसमध्ये
सोनियांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपुरात दोन उमेदवारांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार आणि भाजपाच्या बनवारीलाल पुरोहीत यांच्यावर गुन्हा

बूटफेक्यांचा सुळसुळाट

राजकारण्यांवरचा राग काढण्याचं एकमेव साधन म्हणजे बूट, हे सिद्ध कऱणा-या एकापाठोपाठच्या घटना गेल्या काही दिवसांपासून घडतायेत. अशीच घटना आजही घडली. हरियाणाच्या कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदल यांच्यावरही आज बूट फेकून मारण्यात आला. जिंदल हे एका रॅलीमध्ये असताना एका निवृत्त शिक्षकाने त्यांच्यावर बूट फेकून मारला. राजपाल असं या शिक्षकांचं नाव असून ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.राजपाल यांनी दारूच्या नशेत असं वर्तन केलं आहे, असं विधान नवीन जिंदल यांनी केलंय.राजपाल यांची वैद्यकीय तपासणी कऱण्यात येणार आहे. तसेच सध्या त्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

अपडेट 09 एप्रिल

उद्धव ठाकरे यांची प्रचारार्थ खामगावला (बुलढाणा) जाहीर सभा
* आधी आर.आर.पाटील सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलण्याची भाषा करायचे तेच आर.आर.पाटील आता सावकारांना कोपरापासून ते ढोपरापर्यंत चाटण्याची भाषा करतील -उद्धव ठाकरे
* शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून स्व:तच्या नावावर करायला....मी काही शरद पवारांच्या कुटूंबात जन्माला आलो नाही -उद्धव ठाकरे


राज ठाकरे यांची भांडुपला शिशिर शिंदेंच्या प्रचारार्थ जाहीर सभा

* शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी मराठी आठवते, मराठीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना लाठ्याकाठ्यांनी बदडतांना नाही आठवत - राज ठाकरे
* स्विस बँकेतले पैसे काढण्याची मागणी करतायत, सत्ता असताना का नाही काढले?
* भाजपवाले आता राममंदीर बांधायचं म्हणतायतं, साडेचार वर्षे काय केलं?राज ठाकरे

* टायटलर, सज्जनसिंग यांचे तिकीट कापले, दोघेही 84च्या शीख दंगलीतले आरोपी

बुधवार, ८ एप्रिल, २००९

एप्रिल 08 अपडेट

राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांची टीका
*राजचा विरोध आधी बडव्यांवर होता, आता विठ्ठलावर आहे.
*राज स्व:तचा फोलपणा दाखवून देतोय - उद्धव ठाकरे



* सांगलीने भाजपला भाजपची लायकी दाखवली
* सांगलीत भाजपला साधा उमेदवारही मिळाला नाही - आर.आर.पाटील

कुडाळमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याचा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप
सिधुदुर्ग- कुडाळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी अर्ज दाखल
प्रिया दत्त यांची लढत भाजपच्या महेश जेठमलानी यांच्याशी


दक्षिण मध्य-मुंबईतून काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी यांचा गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल

शरद पवारांची आज ओरिसात भूवनेश्वरला सभा
* सिताराम येचुरीही राहणार सभेला उपस्थित
* ओरिसात राष्ट्रवादी-बीजू जनता दलाची युती

सांगलीत भाजपची नवी खेळी
* भाजपचे उमेदवार दीपक शिंदे यांचा उमेदवारी अर्ज मागे
* अपक्ष उमेदवार अजित घोरपडे यांना पाठिंबा, घोरपडे हे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार
* दीपक शिंदेंच्या नाराज कार्यकर्त्यांकडून मुंबई भाजप कार्यालयासमोर घोषणाबाजी


गोपीनाथ मुंडेंचा स्वतंत्र जाहीरनामा
* मुंडेंचा बीडमध्ये जाहीरनामा घोषित
* शेती पूरक उद्योगांना प्राधान्य
* बीडला विमानतळ उभारण्याचं आश्वासन

मंगळवार, ७ एप्रिल, २००९

अपडेट ०७ एप्रिल

चिदंबरम यांच्यावर भिरकावला बूट

* पी. चिदंबरम यांच्यावर दिल्लीत पत्रकार परिषदेत बूट भिरकावला.
* जगदीश टायटलर यांचे तिकीट कापले जाण्याची शक्य़ता
* बूट भिरकावल्यानंतर काँग्रेसची भूमिका

* टायटलर उत्तर-पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे उमेदवार
* ८४च्या शीख दंगल प्रकरणात जगदीश टायटलर यांना क्लीनचीट
* क्लीनचीट दिल्यामुळे पत्रकारानं बूट भिरकावला
* बूट भिरकावणाऱ्या पत्रकाराचं नावं जर्नेल सिंग.
* अर्ध्यातासाच्या चौकशीनंतर जर्नैल सिंगची सुटका
* जर्नेल सिंग हा दैनिक ‘जागरण’चा पत्रकार
* जागरण जर्नेलवर कारवाई करणार
* जनैरलला अकाली दलाकडून दोन लाखांच बक्षिस

*****************************************************
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे समर्थन

* पत्रकार जर्नेल सिंगची भावना समजून घ्या – उद्धव ठाकरे
* राजची वक्तव्ये शिवसेनेसाठी अदखल पात्र – उद्धव ठाकरे
* लालू यादव यांना तरूंगात पाठवा – उद्धव ठाकरे


*****************************************************

* अरूण गवळी लोकसभा लढवणार नाहीत.
* अरूण गवळींची उमेदवारी मागे
* दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा
यांना गवळींचा पाठिंबा

*************************************************************

सोमवार, ६ एप्रिल, २००९

०६ एप्रिल, अपडेट

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवारांचे मार्गदर्शन
*देशाला स्थिर सरकारची गरज, समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज
*एकाच पक्षाला बहुमत मिळण्याचे दिवस गेले

*शिव्या घालणे हाच मोदींचा एककलमी कार्यक्रम
*देशात विष कालवणाऱ्या शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याची गरज
*एक-एक जागा निवडून आणणे महत्वाचे
*सर्वच्या सर्व जागा जिंकून राज्यात चमत्कार करता आला तर पहा

*******************************************************************
धुळे मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अमरिश पटेल यांचे नामांकन राखीव
दोन दिवसात म्हणणे सादर करण्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आदेश
उमेदवारी अर्जासोबत खोटे प्रतिक्षापत्र, खोटी माहिती दिल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

*******************************************************************
कर्जत- शरद पवारांची सभा
*सहा वर्षात मंदिर का बांधल नाही.
*मोदीच्या गुजरातचा अभिनान नाही तर गांधीजींच्या गुजरातचा अभिमान- शरद पवार

*******************************************************************
मनसे उमेदवाराचा अर्ज नाकारला
औरंगाबाद मतदार संघातील मनसेचे उमेदवार सुभाष पाटील यांच्या ए आणि बी फॉर्मवर वेगवेगळ्या सह्या
सुभाष पाटील हे मनसेचे उमेदवार असल्याचं मान्य करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा नकार

*******************************************************************
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यात राज ठाकरे यांनी खालील मुद्दे मांडले.
* भाजपनं हिंदूत्वाचा आव आणू नये
* सत्तेसाठी शिवसेना – राष्ट्रवादीची छुपी युती
* बाळासाहेब मला नाही तर भाजपला विसरले
* देशात बोगस मतदारांचा सुळसुळाट
* सध्या मी खासदार निवडून आणण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे, ज्यांच्याकडे कमी खासदार आहेत त्यांनी ही पंतप्रधानपदावर लक्ष केंद्रीत केलं आहे, तर मी खासदार निवडून आणण्यावर लक्ष का देवू नये – राज ठाकरे
* मनसे १२ जागा लढणार असून राज ठाकरे २० दिवस दौरा करणार आहेत.
********************************************************************
निवडणूक आयोगाने राबडी देवींच्या भाषणाची सीडी मागवली
****************************************
शेखर सुमन यांना काँग्रेसचं पाटण्यातून तिकीट
शत्रुघ्न सिन्हांच्या विरोधात लढणार शेखर सुमन
****************************************
अबू आझमी उत्तर-पश्चिममधून सपाचे उमेदवार
अबू आझमी यांच्या रॅलीत कार्यकर्त्यांना वाटण्यात आले पैसे
****************************************
दक्षिण मुंबईतून फरहान आझमींना सपाचे तिकीट
फरहान आझमी अबू आझमींचा मुलगा
****************************************
सपाचे नेते अमरसिंग यांना छोटा राजनकडून धमकी
अबू आझमींपासून दूर राहण्याची राजनची धमकी

रविवार, ५ एप्रिल, २००९

अपडेट 05 एप्रिल

औरंगाबाद - स्वीत्झर्लंडला कॅबिनेट मंत्री काम नसताना गेले होते त्यांची चौकशी करा- लालकृष्ण आडवाणी यांची मागणी

पंतप्रधान होण हा शरद पवारांचा छुपा एजंडा – गोपीनाथ
मुंडे
नागपूर-भाजपवाल्यांनी घरं आणि घरवाल्यावाढवल्या – आर आर

पाटील
हिंगोली- दोन्ही काँग्रेसला छगन भुजबळांचा सल्ला- तिकीटासाठी भांडत राहिले तर आघाडीचा तोटा.


बीड- गडकरींना गाय आणि म्हैस हे तरी माहित आहे का? शेती म्हणजे काय हे पिशवीतलं दूध पिणाऱ्यांना काय कळणार? – अजित पवारांची नितीन गडकरी यांच्यावर टीका.

बीड- मुंडे हे पूनम महाजन यांना तिकीट देऊ शकले नाहीत ते कुठले राष्ट्रीय नेते त्यांना पक्षात किंमत नाही- अजित पवार यांची गोपीनाथ मुंडे यांच्यावरही टीका

बुधवार, १ एप्रिल, २००९

अपडेट 01 एप्रिल

तिसऱ्या आघाडीची भुवनेश्वरला सभा, सभेला शरद पवारही राहतील उपस्थित

काँग्रेसमध्ये पैसे देऊन तिकीट मिळतं- अभिनेत्री नगमाची काँग्रेसवर आगपाखड

‘उत्तर मुंबईतून मला निवडणूक लढवायची होती, ही निवडणूक जिंकणे माझ्यासाठी सोपं नाही’ ---- संजय निरूपम यांचे वक्तव्य

नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या मतदानाच्या वेळेत बदल
सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान
राज्यात गडचिरोली, भंडारा नक्षलग्रस्त जिल्हे

काँग्रेसचे दोन उमेदवार जाहीर
लातूरमधून जयवंत आवळे तर पालघरमधून दामू शिंगडा

रामटेक मतदार संघात मामा-भाची आमने सामने
सुलेखा कुंभारे यांच्या विरोधात जोगेंद्र कवाडे

मंगळवार, ३१ मार्च, २००९

31 मार्च अपडेट

संजय दत्त लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही, संजूबाबाला सुप्रीम कोर्टानं परवानगी नाकारली.

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

निलेश राणे यांचा सिंधुदुर्ग लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल
राज्यातील पहिल्याटप्प्यासाठी 345 उमेदवारांचे अर्ज दाखल

सोमवार, ३० मार्च, २००९

अपडेट 30 मार्च

राष्ट्रवादीचे उर्वरित दोन उमेदवारही जाहीर

मावळ मतदारसंघातून आझम पानसरे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी तर
जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून रविंद्र प्रल्हाद पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी.

सुशीलकुमार शिंदे यांनाही सोलापुरातून काँग्रेसची उमेदवारी


मुंबईतील क्रांतीसेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाळगीळ यांची बंडखोरी, गाळगीळ पुण्यातून अपक्ष लढणार.


नाशिक-भुजबळांच्या कळवण येथील सभेत आमदार ए.टी.पवारांचा गोंधळ

पिलिभीतच्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी वरूण गांधींना जामीन मंजूर


शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ठाण्यातील संयुक्तप्रचाराच्या बैठकीत झोंबाझोंबी झाली.
भाजप हा मिळमिळीत पक्ष असल्याची शिवसेना नेते राजाराम साळवी यांची टीका.
टीकेनंतर राजाराम साळवी यांची दिलगिरी.

वरूणवर रासुका


पिलिभीत येथील प्रक्षोबक भाषण प्रकरणी संजय गांधी यांचा मुलगा वरूण गांधी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत. रासुका लावल्यामुळे वरूण गांधींला जामीनासाठी अडचणी येणार आहेत. दरम्यान भाजपने या कारवाईला व्होट बँकेचं राजकारण म्हटलं आहे तसेच पिलिभीत मधून वरूण हेचं उमेदवार असल्याचं सांगितलं आहे.वरूण गांधी यांच्यावर तीन आरोपा करण्यात आले असून त्या आरोपांखाली त्यांच्यावर रासुका लावण्यात आला आहे. पहिला आरोप हा प्रक्षोभक भाषण प्रकरणी तर दुसरा हा रॅलीचा रूट बदलला म्हणून आणि तिसरा आरोप हा पिलिभीत जेलच्या बाहेर वरूण गांधी समर्थकांना केलेल्या राड्याप्रकऱणी आरोप लावण्यात आला आहे.

रविवार, २९ मार्च, २००९

"हाता"ला कोंबडीची साथ..!

महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रचार आता कोंबडी पळालीच्या तालावर होणार आहे. जत्रा या मराठी चित्रपटातलं कोबंडी पळाली आणि तुला शिकविन चांगलाच धडा या चित्रपटातल्या डिप्पाडी डिंपांग या गाण्याच्या चालीवर प्रदेश काँग्रेस आपली प्रचाराची गाणी लिहिणार आहे. त्यासाठी लागणारे हक्क महाराष्ट्र काँग्रेसला मिळाले आहे.
काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याचा ठेका आता फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांनी घेतलाय. कारण जय हो च्या ना-यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने आता प्रचारासाठी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेण्याचं निश्चित केलंय. महाराष्ट्राच्या जनतेच्या ओठावर रूळलेल्या जत्रा या सिनेमातील कोंबडी पळाली अन् तुला शिकविन चांगलाच धडा डिबाडी डिपांग या गाण्यांच्या चालीवर आता कॉंग्रेसच्या प्रचाराचे शब्द फुलणार आहेत. या गाण्यांवर आतापर्यंत अख्ख्या महाराष्ट्राने ठेका धरला तर कॉंग्रेसच्या कार्यकर्ते या गाण्यांच्या चालीवर मतांचा जोगवा मागणार आहेत.
या दोन्ही गाण्यांचे सर्वाधिकार हे व्हिडिओ पॅलेस या कंपनीकड़े आहेत. त्यांच्याकडून कॉंग्रेस पक्षाने रितसर या गाण्यांच्या चालीला मॉडिफाय करण्याच्या हक्काची गेल्या आठवड्याभरापूर्वीच मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रचार मोहिमेत इतर कोणत्याही पक्षावर टीका करणारी भाषा वापरण्यात न आल्याचे पाहून व्हिडिओ पॅलेस या कंपनीने हे हक्क कॉंग्रेसपक्षाला दिल्याचे समजते.
आतापर्यंत स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर अवॉर्डवर शिक्कामोर्तब करणा-या जय हो या ख्यातनाम कवी गुल़ज़ार लिखित अन् ए आर रहमान या गाण्याचे हक्क मिळवण्यात कॉंग्रेसने पहिलटकरणीचा मान मिळवला अन् वेगळ्या धर्तीच्या प्रचाराचा फंडा या निवडणुकीच्या रिंगणात वापरत असल्याचं दाखवून दिलं. यासोबतच आता मराठमोळ्या गाण्यांच्या या निवडीने प्रादेशिक प्रचारासाठी आता हाच फॉर्म्युला नव्याने वापरण्याची क्लृप्ती कॉंग्रेसने वापरल्याची चर्चा आता मराठी संगीत अन् फिल्मी वर्तुळात रंगू लागलीय.

शनिवार, २८ मार्च, २००९

राष्ट्रवादीच्या दोन जागांची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. भंडारा-गोंदियातून प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली असून, उस्मानाबादेत राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत. उरलेल्या जागांची उमेदवारी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

वरुण गांधी यांना अखेर अटक...

मला अटक करा, मला अटक करा म्हणणा-या वरूण गांधीला अखेर अटक करण्यात आली आहे. वरूणला न्यायालयीय कोठडी सुनावण्यात आली असून येत्या 30 मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. वरूण गांधींची रवानगी पिलिभीतच्या तुरुंगात करण्यात आली आहे. पण त्याआधी पिलभितमध्ये वरूण गांधींच्या अटकेच्या ड्रामा उघड झाला. कारण पिलभीत कोर्टानं जर अटकेचा वॉरंटच नाही तर सरेंडर कशासाठी असा सवाल विचारला होता. म्हणजेच मतांच्या गठ्ठ्यांसाठी वरूणनं केलेला हा आणखी एक निष्फळ प्रयत्नच म्हणावा लागेल. आज पिलिभीतमध्ये एखाद्या वीरासारखं वरूणच्या समर्थकांनी त्याचं स्वागत केलं. कोर्टाचा आवार घोषणाबाजीनं दुमदुमून गेला होता.

गुरुवार, २६ मार्च, २००९

पालघर नगरपरिषदेतील सत्ता शिवसेनेनं गमावली

पालघर नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सत्ता गमावली असून पालघर एकता परिषद इथं सत्तेवर आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी आणि बहुजन आघाडी या सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेविरोधात लढण्यासाठी पालघर एकता परिषदेची स्थापना केली होती. या आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकून काठावरचे बहुमत प्राप्त करत सत्ता मिळवली. शिवसेनेला १२ जागा मिळाल्या. केवळ एका जागेमुळे शिवसेनेला सत्ता हातातून गमवावी लागली. मागच्या निवडणुकीत शिवसेनेला १७ जागा मिळाल्या होत्या. पालघर नगरपरिषदेची सत्ता जरी पालघर एकता परिषदेला मिळाली असली तरी नगराध्यक्षपदी शिवसेनेचाच नगरसेवक बसणार आहे. कारण यावेळी पालघर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीतील महिलेसाठी राखीव आहे. आणि या प्रवर्गातील निवडून आलेल्या तीनही महिला शिवसेनेच्याच तिकीटावर निवडून आल्या आहेत. त्यामुळे अन्न आहे पण चावायला दातच नाहीत अशी अवस्था पालघर एकता परिषदेची झाली आहे.

पवार करणार कलमाडींचा प्रचार


पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश कलमाडी यांच्या प्रचारासाठी येत्या शनिवारी स्वतः शरद पवार उतरणार आहेत. कलमाडी आणि पवार यांचं राजकीय वैर लपून राहिलेलं नाही, या पार्श्वभूमीवर पवारांचा कलमाडींसाठी प्रचार करण्याच्या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय. येत्या २८ मार्चला पुण्यातल्या कॉग्रेस भवनात ते सभा घेतील.

रामदास आठवले काँग्रेससोबत!


मागील सोळा वर्ष शरद पवार यांच्याबरोबर असणा-या रामदास आठवलेंनी पवारांना रामराम ठोकून काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आठवले काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणार असून त्यांच्या रिपाई पक्षाने पवारांशी असलेली युती तोडून काँग्रेसबरोबर समझोता केला आहे. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्यानंतर आठवलेंना केंद्रात मंत्री करण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं. मात्र ते पूर्ण केलं नाही. शेवटी शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने तसंच पवारांकडूनही अपेक्षाभंग झाल्याने
आठवलेंनी काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातच त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.

बुधवार, २५ मार्च, २००९

मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा- राष्ट्रवादी

युपीएचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी डॉ.मनमोहन सिंग यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही आधीच पाठिंबा जाहीर केला असून युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंग आहेत असं पक्षाचे महासचिव डी.पी.त्रिपाठींनी सांगितलं.पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असले तरी मनमोहन सिंग यांच्याशी कुणाची बरोबरी होऊ शकत नाहीत असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केलं होतं. शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेबाबत विचारलं असता त्रिपाठी म्हणाले की आमचा पाठिंबा मनमोहन सिंग यांनाच आहे आणि याबाबत कोणताही प्रश्न उदभवू शकत नाही.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी.ए.संगमा यांनी मात्र सोमवारी शरद पवारांनाच पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे त्रिपाठींचे मत त्यांच्या पेक्षा वेगळ असल्याचं स्पष्ट झालयं.

वरुण गांधी यांची याचिका फेटाळली



भाजपाचा युवा नेता वरुण गांधी याची याचिका अलाहाबाद हायकोर्टनं फेटाळलीयं. पिलिभीत इथं वादग्रस्त भाषण केल्याबद्दल वरुण गांधी याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आलीयं. याविरुद्ध वरुणनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टानं वरुण गांधी याची याचिका फेटाळली दरम्यान,पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांनी शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून वरुणने ही प्रतिक्रिया व्यक्त केलीयं. पिलिभीतमधल्या वादग्रस्त भाषणाला सुरुवातीलाचं शिवसेनेनं पाठिंबा दिला

मंगळवार, २४ मार्च, २००९

आरोप - प्रत्यारोप

काँग्रेस आणि भाजपामधल्या आरोप प्रत्यारोपांना आता ऊत आलाय. पण आता या स्पर्धेत उतरलेत दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते...विद्यमान पंतप्रधान मनमोहनसिंग आणि भाजपाचे पंतप्रधानपदाचे दावेदार लालकृष्ण अडवाणी...मंगळवारी या दोघांमध्ये चांगलीच जुंपली.

सुरूवातीला मथुरेतल्या एका सभेत बोलताना लालकृष्ण अडवाणींनी मनमोहनसिंगांना सोनियांच्या हातातील बाहुला आणि आतापर्यंतचे सगळ्यात दुबळे पंतप्रधान असं म्हटलं...


एरवी शब्दाला शब्द न वाढवणारे मनमोहनसिंग यांनी यावेळी मात्र मौन सोडलं आणि अडवाणींचा रेकॉर्ड सर्वांनीच पाहिलाय, तेव्हा बाबरी मशीद पाडणा-याला पंतप्रधानपदी बसवायचं की नाही हे तुम्हीच ठरवा, असा टोला लगावला.

काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा दिल्लीत जाहीर झाला . जाहीरनाम्यात नव्या आश्वासनांची खैरात करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे सर्व ज्येष्ट नेते उपस्थित होते. धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी आमचा संघर्ष असल्याचं सोनिया गांधी य़ांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत, पण पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंग समर्थ असल्याचंही सोनियांनी सांगितलं.

दहशतवादाचा मुकाबला आमच्या सरकारने बिनतोडपणे केला तर, आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात देशाचा चौफेर विकास झाला. देशातील स्थिर मजबूत सरकार दक्षिण आशियाला बळकटी देईल.तसंच शेजारील देशातील अस्थिरता ही स्थिती चिंताजनक असून गेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही जी आश्वासने दिली ती पाळून दाखवली असं जाहीरनाम्यात मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. विकासाचा हा वेग कायम ठेवायचा असेल तर काँग्रेसला पर्याय नाही आणि भाजप जाती धर्माच्या आधारे देशाची फाळणी करु पाहत आहेत अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.

सोमवार, २३ मार्च, २००९

शिवसेना-भाजपाचे उमेदवार

शिवसेनेनंही आपले दोन उमेदवार जाहीर केलेत. कल्याणच्या जागेवर आनंद परांजपे तर ठाण्यातून विजय चौगुलेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

भाजपानंही आपले उमेदवार जाहीर केले आहेत
अहमदनगर-दिलीप गांधी
नांदेड-संभाजी पवार
पुणे-अनिल शिरोळे
जळगाव-ए.टी.पाटील
नंदूरबार-सुहास नटावदकर
धुळे-प्रतापराव सोनावणे
वर्धा-सुरेश वाघमारे
चंद्रपूर- हंसराज अहिर

काँग्रेसच्या आठ उमेदवारांची नावं निश्चित

काँग्रेसच्याही महाराष्ट्रातल्या आठ जागांची आणि उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.


मुंबई दक्षिण-मिलिंद देवरा
पुणे-सुरेश कलमाडी
नागपूर-विलास मुत्तेमवार
रायगड-ए. आर. अंतुले
सिंधुदुर्ग- निलेश राणे
मुंबई- प्रिया दत्त

राष्ट्रवादीची १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर


राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेसाठीच्या 18 उमेदवारांची पहिली यादी आर.आर.पाटील यांनी जाहीर केली. साताऱ्याची उमेदवारी पदरात पाडून घेण्यात उदयनराजेंना यश आलय तर राष्ट्रवादीचा दुसरी यादी पाच एप्रिलला जाहीर होणार आहे.
जळगाव – वसंत मोरे,
अमरावती - राजेंद्र गवई
बारामती - सुप्रिया सुळे
बीड - रमेश अडस्कर
माढा - शरद पवार
दिंडोरी - नरहरी झिरव्हा
नगर - शिवाजी कर्डीले
नाशिक - समीर भुजबळ
ठाणे - संजीव नाईक
कल्याण - वसंत डावखरे
परभणी - सुरेश वरपुडकर
हिंगोली - सूर्यकांता पाटील
हातकणंगले - निवेदीता माने
शिरूर - विलास लांडे
सातारा - उदयन राजे भोसले
कोल्हापूर - संभाजीराजे
बुलढाणा - राजेंद्र शिंगणे
मुंबई उत्तर पूर्व - संजय पाटील

जागावाटपाचा घोळ मिटला

जागावाटपाच्या मुद्द्यावर आज काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक घेतली गेली.अखेर जागावाटपाचा हा घोळ मिटल्याची चिन्हं आहेत.दीड महिन्यांच्या चर्चा आणि बैठकांनंतर अखेर तोडगा सापडला असं म्हणायला हरकत नाही






कोणाला कोणत्या जागा मिळाल्या ते पाहूया पुढीलप्रमाणे-
काँग्रेसला मिळालेल्या जागा -
नंदूरबार,धुळे,अकोला ,वर्धा,रामटेक,नागपूर,गडचिरोली-चिमूर,चंद्रपूर,यवतमाळ-वाशिम,नांदेड,जालना,औरंगाबाद,पालघर,भिवंडी,उत्तर मुंबई,वायव्य मुंबई,
उत्तर-मध्य मुंबई,दक्षिण-मध्य मुंबई,मुंबई दक्षिण,रायगड,
पुणे, शिर्डी,लातूर,सोलापूर,सांगली,रत्नागिरी-सिंधुदुर्ग



राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या जागा -

जळगाव,रावेर,बुलडाणा,अमरावती,भंडारा-गोंदिया,
हिंगोली,परभणी,दिंडोरी,नाशिक,कल्याण,ठाणे,मुंबई ईशान्य,
मावळ,बारामती,शिरूर,अहमदनगर,बीड,
उस्मानाबाद,माढा,सातारा,कोल्हापूर,हातकणंगले

विलासरावांचे स्वप्न अधूरेच


ज्या उस्मानाबाद मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कंग्रेसचं जागा वाटपाचं घोडं अडलं होतं, तो उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिला आहे. मागील जागावाटपात उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. मागील आठवडाभर याच जागेवरून दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलाच नाही. त्यामुळे विलासराव देशमुखांचे लोकसभेवर जाण्याचे स्वप्न अधूरेच राहणार आहे.

राजकीय पक्षांकडून मतदार राजाच्या अपेक्षा

लोकसभेच्या निवडणुकीत मतदार मतदान करताना कोणत्या मुद्दांना प्राधान्यक्रम देतात हे स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षणात जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. त्याचप्रमाणे एकादा विशष्ट प्रश्न किंवा समस्या यांचं आव्हान कोणता राजकीय पक्ष ताकदीने पेलू शकेल असं त्यांना वाटतं या विषयी त्यांनी व्यक्त केलेली ही मतं.
विशिष्ट पक्षालाच मतदान करण्याविषयी कारण विचारला असता मतदारांनी दिलेली उत्तर अशी होती
गावांच्या सुधारणा योजना राबविल्याने काँग्रेसला पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३ टक्के तर शिवसेनेला २८ टक्के भाजपला २२ टक्के राष्ट्रवादीला २३ टक्के आणि बसपाला १७ टक्के कौल सॅम्पलमधील प्रश्नकर्त्यांनी दिला.
राज्यातील द्रारिद्र्य निर्मुलना संदर्भात काँग्रेसला २२ टक्के, शिवसेनेला २६ टक्के, भाजपला १४ टक्के, राष्ट्रवादीला २१ तर बसपाला २२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
रोजगार निर्मिती संदर्भात काँग्रेसला १८ टक्के, शिवसेनेला २० टक्के, भाजपला २० टक्के, राष्ट्रवादीला २१ टक्के तर बसपाला १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत काँग्रेसच्या बाजुने १७ टक्के, शिवसेना १९ टक्के, भाजप सर्वाधिक २७ टक्के, राष्ट्रवादी १७ टक्के आणि बसपा फक्त ६ टक्के कौल देण्यात आला.
शेतकऱ्यांना सहाय्य्कारी योजनां संदर्भात काँग्रेसला १७ टक्के, शिवसेनेला १५ टक्के, भाजप १६ टक्के, राष्ट्रवादी १८ टक्के, बसपा ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.पक्ष नेतृत्वामुळे पक्षाला पसंतीक्रम देताना लोकांनी काँग्रेसच्या बाजुने १६ टक्के, शिवसेनाला २३ टक्के, भाजपला १६ टक्के, राष्ट्रवादी १६ टक्के, बसपाला सर्वाधिक २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.सर्वांना वीजेच्या उपलब्धतेच्या निकषावर काँग्रेसला १२ टक्के, शिवसेनेला ८ टक्के, भाजपला १५ टक्के, राष्ट्रवादीला १३ टक्के तर बसपाला फक्त ६ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
जातीय सलोखा राखण्या संदर्भात तसचं अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाबाबत काँग्रेसला १० टक्के, शिवसेनेला फक्त ४ टक्के, भाजपलाही ४ टक्के राष्ट्रवादीला त्याहीपेक्षा कमी ३ टक्के आणि बसपाला ११ टक्के लोकांनी मत दिली आहेत.
पिण्याचं पाणी उपल्बध करुन देण्याच्या निकषावर काँग्रेसला ९ टक्के, शिवसेनेला ६ टक्के, भाजपला ११ टक्के, राष्ट्रवादीला ११ टक्के आणि बसपाला ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजूने ९ टक्के, शिवसेना ११ टक्के, भाजप ८ टक्के, राष्ट्रवादी ६ टक्के आणि बसपा ६ टक्के लोकांनी मत नोंदवलं आहे. भ्रष्टाचार कमी करण्याबाबत काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे ८ टक्के, शिवसेना ९ टक्के, भाजप १० टक्के, राष्ट्रवादी १० टक्के आणि बसपा १२ टक्के आहे.सर्वांना शैक्षणिक लाभ पोहचवण्या संदर्भात काँग्रेसच्या पारड्यात ८ टक्क्यांनी, शिवसेनेच्या ७ टक्के, भाजप ७ टक्के, राष्ट्रवादी ८ टक्के आणि बसपा १३ टक्के लोकांनी मत टाकलं आहे.
महिला आणि बालिका कल्याणासाठी काम करण्याबाबत काँग्रेसवर ६ टक्के, शिवसेनेवर अवघ्या २ टक्के, भाजप ३ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपावर २ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे.
दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करण्या संदर्भात काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणऱ्यांची संख्या आहे ५ टक्के तर शिवसेनेवर १० टक्के, भाजप ९ टक्के, राष्ट्रवादी ५ टक्के आणि बसपावर ४ टक्के इतकी आहे.
उद्योग क्षेत्र विकास संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ५ टक्के, शिवसेना ६ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा ७ टक्के कौल लोकांनी दिला आहे
वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत लोकांनी काँग्रेस ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा २ टक्के पसंती दिली आहे.दुरसंचार सुविधांबाबत काँग्रेसला ४ टक्के, शिवसेनेला ३ टक्के, भाजप ४ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपाला २ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
मागावर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला पाठिंबा देण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के, बसपा सर्वाधिक १९ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
रस्ते बांधणीबाबत काँग्रेस २ टक्के, शिवसेना १ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी २ टक्के, बसपा १ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
चांगला पक्ष अशी काँग्रेसबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे अवघी १ टक्के तीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपचीही आहे.
बहुतांश मतदारांनी राजकीय पक्षांकडून फार अपेक्षा करणं सोडून दिलयं असाच निष्कर्ष वरील आकडेवारीवरुन काढला तर ते वावगं ठरु नये. राजकीय पक्षांना अंतर्मुख करणारी मतंच नागरिकांनी व्यक्त केली आहे.

रविवार, २२ मार्च, २००९

वरूण गांधी अखेर दोषी


प्रक्षोभक भाषणप्रकरणी वरूण गांधींना अखेर निवडणूक आयोगानं दोषी ठरवलं आहे. उत्तरप्रदेशमधल्या पिलभीत येथे वरूण गांधी यांनी आपल्या भाषणात प्रक्षोभक विधानं केल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगानं वरूण गांधींना दोषी ठरवलं आहे. त्याचप्रमाणं निवडणूक आयोगानं भाजपालाही वरूण गांधींना उमेदवारी न देण्याची सूचना केली आहे.पुढे जाऊन वरूण गांधींवर सार्वजनिक भाषण बंदीचीही कारवाई होऊ शकते.त्यामुळं भाजपानं ''चिंगारी'' असा ढोल बडवत स्टार प्रचारक म्हणून उतरवलेली वरूण गांधी नावाची ही ''चिंगारी'' निवडणुकीआधीच विझली आहे.

मनसेचा प्रचाराचा नारळ फुटला

शनिवार, २१ मार्च, २००९

मंडलिकांचा 'राष्ट्रवादी'ला रामराम

शरद पवार यांच्यावर टीका करुन बंडाचे निशाण फडकावणारे सदाशिवराव मंडलिक यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीने कोल्हापुरातून उमेदवारी दिली तरी अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळं मंडलिक यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळण्याची शक्यता संपुष्टात आलीय. त्यामुळे मंडलिक गेले चार दिवस जिल्ह्यात चाचपणी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. कोल्हापूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना मंडलिक यांना मदत करेल तर हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांच्यामागे मंडलिक समर्थक उभे राहतील. खासदार मंडलिक आणि राजू शेट्टी यांच्या हातमिळवणीने कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलतील असं जाणकारांचं मत आहे.

26-22 च्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जागावाटपाचा घोळ एकादाचा सुटला असं म्हणायला हरकत नाही. २६-२२च्या फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षात एकमत झालंय. काँग्रेसच्या रात्री पार पडलेल्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत आठ उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

काय बोलले उद्धव ठाकरे?

शुक्रवार, २० मार्च, २००९

अपडेट 20 मार्च

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 22-26 फॉर्म्युल्याच्या समझोत्याची राष्ट्रवादीचे तारिक अन्वर यांच्याकडून दिल्लीत घोषणा तर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप अजून पूर्ण झाले नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे मुंबईत वक्तव्य.

राष्ट्रवादीकडून काही जागांच्या संबंधी मुद्दे स्पष्ट करावेत- माणिकराव ठाकरे

लखनौ-बसपा उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या सर्व ८० जागा लढविणार
दिल्ली-राष्ट्रीय जनता दलाचे साधू यादव, गिरिधारी यादव, रामय्या राम यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई- पैसे वाटल्याप्रकरणी अभिनेता, खासदार गोविंदा जिल्हाधिकाऱ्यासमोर हजर, पैसे वाटण्याचा आरोप हे राजकीय षडयंत्र

लोकसभेसाठी कांतीसेनेच्या 19 उमेदवारांची औरंगाबादमध्ये घोषणा
मराठवाड्यातून ६ तर मुंबईतून २ उमेदवार

काँग्रेस राष्ट्रवादीचे संभाव्य जागा वाटप
राष्ट्रवादीच्या 22 जागा- अकोला, दिंडोरी, नॉर्थ ईस्ट मुंबई, उस्मानाबाद, बारामती, बीड, माढा,
अहमदनगर, हिंगोली, परभणी,नाशिक, कल्याण,ठाणे, मावळ, शिरूर,सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, जळगाव, रावेर, बुलढाणा, भंडारा.

काँग्रेसच्या 26 जागा-धुळे, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, पालघर, सांगली, शिर्डी, जालना, रामटेक, पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नॉर्थवेस्ट –मुंबई, मुंबई-उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबार, भिवंडी, लातूर, सोलापूर.

नाशकात उद्या राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार
नाशकात मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटीशी, प्रक्षोभक भाषण न करण्याच्य़ा सूचना

मेघालयातील राष्ट्रपती राजवटी विरोधात पी.ए.संगमांनी घेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी प्रकाश करात, सीताराम येच्यूरी यांचीही घेतली भेट
लालकृष्ण आडवाणींनाही भेटले राष्ट्रवादीचे नेते पी.ए.संगमा

गोविंदा..गोविंदा

शिवसेनेचे १५ उमेदवार जाहीर