युपीएचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी डॉ.
मनमोहन सिंग यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही आधीच पाठिंबा जाहीर केला असून युपीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहन सिंग आहेत असं पक्षाचे महासचिव डी.पी.त्रिपाठींनी सांगितलं.पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असले तरी मनमोहन सिंग यांच्याशी कुणाची बरोबरी होऊ शकत नाहीत असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केलं होतं. शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या महत्वाकांक्षेबाबत विचारलं असता त्रिपाठी म्हणाले की आमचा पाठिंबा मनमोहन सिंग यांनाच आहे आणि याबाबत कोणताही प्रश्न उदभवू शकत नाही.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पी.ए.संगमा यांनी मात्र सोमवारी शरद पवारांनाच पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे त्रिपाठींचे मत त्यांच्या पेक्षा वेगळ असल्याचं स्पष्ट झालयं.
