बुधवार, १८ मार्च, २००९

वरूण गांधींच्या यापुढील सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग

वरूण गांधींच्या यापुढील सर्व सभांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याप्रकरणी पिलिभितच्या जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलिस उपअधिक्षकांची बदली करण्यात आली आहे.वरूण गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.वरूण गांधी यांनी सहा मार्चच्या सभेत पिलिभित येथे प्रक्षोभक भाषण केलं होतं. निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर वरूण गांधी यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 153-ए नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करण्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.निवडणूक आयोगाने वरूण गांधी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा