बुधवार, १८ मार्च, २००९

हे राजकीय षड्यंत्र - वरुण गांधी


आपल्या भाषणाबाबत वरुण गांधींनी आज मीडियासमोर खुलासा केला आहे. पिलभीतमध्ये केलेल्या भाषणावर सफाई देताना वरूण यांनी माझ्याविरोधात विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. मी भारताविरोधी कोणतंच भाष्य केलं नाही.मला हिंदुत्वावर गर्व असून माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे.मी गांधी,हिंदू आणि मुख्य म्हणजे भारतीय आहे.समाजात असंतोष परसरविण्याचा माझा उद्देश अजिबात नाही. मी नेहमी भारताच्या हिताचाच पुरस्कार केलाय. शिवाय ४ तारखेचं भाषण १६ तारखेला दाखवलंच कसं असा सवालही त्यांनी विचारलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा