स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक जीवनावश्यक गरजांची अजुन पूर्तता होत नसताना लालकृष्ण आडवाणी यांनी एक अफलातून आश्वासन दिलं आहे. भाजप प्रणीत एनडीए सत्तेवर आल्यास गरीबांना मोफत मोबाईल देऊ एवढच नाही तर विद्यार्थ्यांना दहा हजारात लॅपटॉप देण्याचं आश्वासनही लालकृष्ण आडवाणी यांनी देऊन टाकलं आहे.निवडून येण्याच्या आधी राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडतो.
देशातील राजकीय नेत्यांनी मागील अनेक वर्षांपासून आश्वासन दिल्यानंतर अनेक गावांमध्ये अजुन पाणी हाच प्रश्न सुटलेला नसताना या अफलातून आश्वासनामुळे राजकारणात वादंग माजेल असं जाणकारांना वाटतयं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा