
राज्यात काही भागांमध्ये प्रभाव असणाऱ्या छोट्या पक्षांशी जागा वाटपाची बोलणी करण्यात येत आहेत. जिथे काँग्रेसला स्वताला उमेदवार उभं करणं शक्य होणार नाही तिथे अशा छोट्या पक्षांना जागा सोडण्यात येतील असं जोशी म्हणाल्या.
समाजवादी पक्षाने जागा वाटपाची बोलणी पूर्णपणे बंद केल्यानंतर काँग्रेसने आता निवडणूक पूर्व युतीसाठी छोट्या पक्षांशी संपर्क साधला आहे. समाजवादी पक्षाशी युती होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण ज्या जागा काँग्रेसच्या ताब्यात आहेत तिथे उमेदवार उभ न करण्याचं आश्वासन देखील त्यांनी पाळेललं नाही असं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसने अपना दल, बहुजन समाज स्वाभिमान संघर्ष समिती या सारख्या छोट्या पक्षांशी संपर्क साधला आहे. या पक्षांचा काही भागांवर आणि जातींवर प्रभाव आहे त्यामुळेच त्यांच्याशी बोलणी सुरु करण्यात आली आहेत.