
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीबाबत आणि जागावाटपाबाबत तळ्यात मळ्यात असे वातावरण असताना आणि चर्चेच्या गुऱ्हाळांचा चरखा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत रोजच्यारोज दळला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या संभाजीराजेंनी प्रथमच अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आहे. संभाजीराजेंनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी निवड केलीय तीसुद्धा काँग्रेसशी युती करण्याबाबत झोक्यावर झोके घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशी. त्यांनी कोल्हापूरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी ते सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्य करत होते. छ. संभाजीराजेंचे बंधू मालोजीराजे हे काँग्रेसचे आमदार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा