शनिवार, ७ मार्च, २००९

अखेर शरद पवार माढ्यातून निवडणूक लढविणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर जिल्ह्यातील माढ्यातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. शरद पवार यांनी पुण्य़ात आज ही घोषणा केली.

विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांना माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला होता.सुरवातीला शरद पवार नेमके कुठून निवडणूक लढविणार य़ासाठी अनेक तर्क-वितर्क काढले जात होते. शरद पवार हे शिरूर मतदार संघातून निवडणूक लढवतील अशाही शक्यता वर्तविण्यात येत होती. नाशिक जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनीही शरद पवारांनी नाशिकमधून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता.

यापूर्वी शरद पवार बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा