लोकसभेच्या निवडणुकीत मतदार मतदान करताना कोणत्या मुद्दांना प्राधान्यक्रम देतात हे स्टार माझा-नेल्सन सर्वेक्षणात जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न. त्याचप्रमाणे एकादा विशष्ट प्रश्न किंवा समस्या यांचं आव्हान कोणता राजकीय पक्ष ताकदीने पेलू शकेल असं त्यांना वाटतं या विषयी त्यांनी व्यक्त केलेली ही मतं.
विशिष्ट पक्षालाच मतदान करण्याविषयी कारण विचारला असता मतदारांनी दिलेली उत्तर अशी होती
गावांच्या सुधारणा योजना राबविल्याने काँग्रेसला पसंती देणाऱ्यांची संख्या होती २३ टक्के तर शिवसेनेला २८ टक्के भाजपला २२ टक्के राष्ट्रवादीला २३ टक्के आणि बसपाला १७ टक्के कौल सॅम्पलमधील प्रश्नकर्त्यांनी दिला.
राज्यातील द्रारिद्र्य निर्मुलना संदर्भात काँग्रेसला २२ टक्के, शिवसेनेला २६ टक्के, भाजपला १४ टक्के, राष्ट्रवादीला २१ तर बसपाला २२ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.
रोजगार निर्मिती संदर्भात काँग्रेसला १८ टक्के, शिवसेनेला २० टक्के, भाजपला २० टक्के, राष्ट्रवादीला २१ टक्के तर बसपाला १८ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत काँग्रेसच्या बाजुने १७ टक्के, शिवसेना १९ टक्के, भाजप सर्वाधिक २७ टक्के, राष्ट्रवादी १७ टक्के आणि बसपा फक्त ६ टक्के कौल देण्यात आला.
शेतकऱ्यांना सहाय्य्कारी योजनां संदर्भात काँग्रेसला १७ टक्के, शिवसेनेला १५ टक्के, भाजप १६ टक्के, राष्ट्रवादी १८ टक्के, बसपा ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.पक्ष नेतृत्वामुळे पक्षाला पसंतीक्रम देताना लोकांनी काँग्रेसच्या बाजुने १६ टक्के, शिवसेनाला २३ टक्के, भाजपला १६ टक्के, राष्ट्रवादी १६ टक्के, बसपाला सर्वाधिक २६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.सर्वांना वीजेच्या उपलब्धतेच्या निकषावर काँग्रेसला १२ टक्के, शिवसेनेला ८ टक्के, भाजपला १५ टक्के, राष्ट्रवादीला १३ टक्के तर बसपाला फक्त ६ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
जातीय सलोखा राखण्या संदर्भात तसचं अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाबाबत काँग्रेसला १० टक्के, शिवसेनेला फक्त ४ टक्के, भाजपलाही ४ टक्के राष्ट्रवादीला त्याहीपेक्षा कमी ३ टक्के आणि बसपाला ११ टक्के लोकांनी मत दिली आहेत.
पिण्याचं पाणी उपल्बध करुन देण्याच्या निकषावर काँग्रेसला ९ टक्के, शिवसेनेला ६ टक्के, भाजपला ११ टक्के, राष्ट्रवादीला ११ टक्के आणि बसपाला ५ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजूने ९ टक्के, शिवसेना ११ टक्के, भाजप ८ टक्के, राष्ट्रवादी ६ टक्के आणि बसपा ६ टक्के लोकांनी मत नोंदवलं आहे. भ्रष्टाचार कमी करण्याबाबत काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे ८ टक्के, शिवसेना ९ टक्के, भाजप १० टक्के, राष्ट्रवादी १० टक्के आणि बसपा १२ टक्के आहे.सर्वांना शैक्षणिक लाभ पोहचवण्या संदर्भात काँग्रेसच्या पारड्यात ८ टक्क्यांनी, शिवसेनेच्या ७ टक्के, भाजप ७ टक्के, राष्ट्रवादी ८ टक्के आणि बसपा १३ टक्के लोकांनी मत टाकलं आहे.
महिला आणि बालिका कल्याणासाठी काम करण्याबाबत काँग्रेसवर ६ टक्के, शिवसेनेवर अवघ्या २ टक्के, भाजप ३ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपावर २ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे.
दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करण्या संदर्भात काँग्रेसवर विश्वास व्यक्त करणऱ्यांची संख्या आहे ५ टक्के तर शिवसेनेवर १० टक्के, भाजप ९ टक्के, राष्ट्रवादी ५ टक्के आणि बसपावर ४ टक्के इतकी आहे.
उद्योग क्षेत्र विकास संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ५ टक्के, शिवसेना ६ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा ७ टक्के कौल लोकांनी दिला आहे
वैद्यकीय सुविधा पुरविण्याबाबत लोकांनी काँग्रेस ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप ५ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपा २ टक्के पसंती दिली आहे.दुरसंचार सुविधांबाबत काँग्रेसला ४ टक्के, शिवसेनेला ३ टक्के, भाजप ४ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के आणि बसपाला २ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
मागावर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षणाला पाठिंबा देण्या संदर्भात काँग्रेसच्या बाजुने ४ टक्के, शिवसेना ३ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी ३ टक्के, बसपा सर्वाधिक १९ टक्के लोकांनी कौल दिला आहे.
रस्ते बांधणीबाबत काँग्रेस २ टक्के, शिवसेना १ टक्के, भाजप २ टक्के, राष्ट्रवादी २ टक्के, बसपा १ टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
चांगला पक्ष अशी काँग्रेसबद्दल भावना व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे अवघी १ टक्के तीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपचीही आहे.
बहुतांश मतदारांनी राजकीय पक्षांकडून फार अपेक्षा करणं सोडून दिलयं असाच निष्कर्ष वरील आकडेवारीवरुन काढला तर ते वावगं ठरु नये. राजकीय पक्षांना अंतर्मुख करणारी मतंच नागरिकांनी व्यक्त केली आहे.