मनसे मुंबईतल्या लोकसभेच्या सहाच्या सहा जागा लढविणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात काही निवडक मतदार संघांमध्येही मनसे निवडणूक लढविणार आहे.मराठीचा मुद्द्यावर मनसे ठाम असून याच मुद्यावर मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा सेनेला जिंकता आली होती. पाच जागांवर काँग्रेसने मजल मारली होती. त्यामुळे शिवसेनेसाठी ही एक डोकेदुखी ठरणार आहे. जर मनसेमुळे शिवसेनेच्या मतांवर परिणाम होत असेल तर सहाजिकच भाजपच्या मतांवरही परिणाम होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा