
या प्रक्षोभक भाषणाची दखल निवडणूक आयोगानं घेतली आणि त्यांना नोटीसही बजावली. पण आता हे प्रकरण इतक्यात शांत होण्याची चिन्हं नाहीएत. कारण भाजपामधील मुस्लिम नेते वरूण गांधींच्या भाषणावर नाराज झाले आहेत. त्यांनी वरूण गांधींना धारेवर धरलय. आणि तोंडावर लगाम घालण्याचा इशाराही दिलाय.पण प्रकरण चिघळल्यावर वरूण गांधींनी मीडियाला मिळालेली भाषणाची सीडी बनावट असल्याचं म्हटलय.
दुसरीकडे भाजपा नेते व्यंकय्या नायडूंनी मात्र वरूण गांधींना पाठिंबा दिलाय. त्यामुळे वरूण गांधी प्रकरणावरून भाजपामध्ये दोन गट पडण्याची चिन्ह आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वरूण गांधींनी एका समाजाला दुखावलय. सुजाण मतदार मतपेटीच्या माध्यमातून त्यांना हिसका दाखवतील. मात्र निवडणुकीत मताचा जोगवा मागायला जाणा-या भाजपाच्या अडचणीत आणखीनच भर पडलीए हे मात्र नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा