मंगळवार, १७ मार्च, २००९

भाषणाआधी पुरेशी तयारी करा!

भाजपने आपल्या सर्व उमेदवारांना भाषण करण्याआधी पुरेशी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपचे उमेदवार वरूण गांधी यांनी पिलीभित येथे प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
आम्ही आमच्या उमेदवारांना भाषणाची तयारी करण्याची तसेच संसदीय भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत असे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सिद्धार्थ नाथ यांनी दिल्लीत सांगितलं. पिलिभितमधील प्रक्षोभक भाषण प्रकरणी आम्ही योग्य ती कारवाई करू पण त्या भाषणात खरोखर प्रक्षोभकपणा होता का याचे पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरणी भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी वरूण गांधी यांच्यावर टीका केली आहे.
वरूण गांधी यांनी पिलिभित येथील भाषणात म्हणाले "हा काँग्रेसचा हात नसून भाजपचं कमळाचं फूल आहे. आणि हे फूल.......चे शीर कापेल, जय श्री राम." इंदिरा गांधी यांचे नातू असलेले वरूण गांधी हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर "हिन्दू हे कमकुवत आणि नेतृत्वहीन झाले आहेत असं कुणी म्हणत असेल तर मी त्यांचे हात कापेल"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा