मंगळवार, २४ मार्च, २००९

काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा दिल्लीत जाहीर झाला . जाहीरनाम्यात नव्या आश्वासनांची खैरात करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे सर्व ज्येष्ट नेते उपस्थित होते. धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायासाठी आमचा संघर्ष असल्याचं सोनिया गांधी य़ांनी स्पष्ट केलं. पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत, पण पंतप्रधान पदासाठी मनमोहन सिंग समर्थ असल्याचंही सोनियांनी सांगितलं.

दहशतवादाचा मुकाबला आमच्या सरकारने बिनतोडपणे केला तर, आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात देशाचा चौफेर विकास झाला. देशातील स्थिर मजबूत सरकार दक्षिण आशियाला बळकटी देईल.तसंच शेजारील देशातील अस्थिरता ही स्थिती चिंताजनक असून गेल्या निवडणुकीच्या काळात आम्ही जी आश्वासने दिली ती पाळून दाखवली असं जाहीरनाम्यात मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केलं. विकासाचा हा वेग कायम ठेवायचा असेल तर काँग्रेसला पर्याय नाही आणि भाजप जाती धर्माच्या आधारे देशाची फाळणी करु पाहत आहेत अशी टीकाही मनमोहन सिंग यांनी केली.