शनिवार, २८ मार्च, २००९

वरुण गांधी यांना अखेर अटक...

मला अटक करा, मला अटक करा म्हणणा-या वरूण गांधीला अखेर अटक करण्यात आली आहे. वरूणला न्यायालयीय कोठडी सुनावण्यात आली असून येत्या 30 मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. वरूण गांधींची रवानगी पिलिभीतच्या तुरुंगात करण्यात आली आहे. पण त्याआधी पिलभितमध्ये वरूण गांधींच्या अटकेच्या ड्रामा उघड झाला. कारण पिलभीत कोर्टानं जर अटकेचा वॉरंटच नाही तर सरेंडर कशासाठी असा सवाल विचारला होता. म्हणजेच मतांच्या गठ्ठ्यांसाठी वरूणनं केलेला हा आणखी एक निष्फळ प्रयत्नच म्हणावा लागेल. आज पिलिभीतमध्ये एखाद्या वीरासारखं वरूणच्या समर्थकांनी त्याचं स्वागत केलं. कोर्टाचा आवार घोषणाबाजीनं दुमदुमून गेला होता.