शनिवार, २१ मार्च, २००९
मंडलिकांचा 'राष्ट्रवादी'ला रामराम
शरद पवार यांच्यावर टीका करुन बंडाचे निशाण फडकावणारे सदाशिवराव मंडलिक यांनी आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीने कोल्हापुरातून उमेदवारी दिली तरी अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलाय. शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळं मंडलिक यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळण्याची शक्यता संपुष्टात आलीय. त्यामुळे मंडलिक गेले चार दिवस जिल्ह्यात चाचपणी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. कोल्हापूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना मंडलिक यांना मदत करेल तर हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांच्यामागे मंडलिक समर्थक उभे राहतील. खासदार मंडलिक आणि राजू शेट्टी यांच्या हातमिळवणीने कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातली राजकीय समीकरणं बदलतील असं जाणकारांचं मत आहे.