
ज्या उस्मानाबाद मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कंग्रेसचं जागा वाटपाचं घोडं अडलं होतं, तो उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिला आहे. मागील जागावाटपात उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी काँग्रेसने उस्मानाबाद मतदारसंघाची मागणी केली होती. मात्र या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला होता. मागील आठवडाभर याच जागेवरून दोन्ही पक्षात चर्चा सुरू होती. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडलाच नाही. त्यामुळे विलासराव देशमुखांचे लोकसभेवर जाण्याचे स्वप्न अधूरेच राहणार आहे.