सोमवार, १६ मार्च, २००९

नोटीशीला गोविंदाचं उत्तर

होळीच्या दिवशी पैसे दिल्याप्रकरणात निवडणूक आयोगाच्या नोटीसीला काँग्रेसचा खासदार अभिनेता गोविंदानं आज उत्तर दिलं आहे. अकरा मार्च रोजी होळीच्या दिवशी गोविंदानं घरासमोर जमलेल्या लोकांना पाचशेच्या नोटा वाटल्या होत्या. पैसे वाटल्याची बाब खटकल्यानं निवडणूक आयोगानं गोविंदाला नोटीसही बजावलीयं. यावर आज गोविंदा स्वतःचं म्हणणं मांडलं आहे. मात्र, होळीच्या दिवशी पैसे वाटणं ही एक परंपरेचा भाग आहे असं म्हणतं गोविंदानं पैसे वाटल्याचं समर्थन केलं होतं. तसचं आता तर मी काँग्रेसचा उमेदवारही नाही त्यामुळं मी चुकीचं काय केलं असा सवालही त्यानं विचारला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा