मंगळवार, १७ मार्च, २००९

उमा भारतींचा पंतप्रधानपदासाठी आडवाणींना पाठिंबा

भारतीय जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षा उमा भारती यांनी पंतप्रधानपदासाठी लालकृष्ण आडवाणी यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचं पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी स्वागत केलं आहे. उमा भारती यांनी लालकृष्ण आडवाणी यांना पत्र लिहून पाठिंबा दिला आहे. दरम्यान उमा भारती यांनी याचा अर्थ आपण भाजपमध्ये परतणार आहोत असा नसल्याचं म्हटलं आहे.
आपल्या पत्रातील संदेशात उमा भारती यांनी लालकृष्ण आडवाणी सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असून पंतप्रधानपदाला लायक उमेदवार असल्याचं म्हटलं आहे. आडवाणींना पंतप्रधानपदी पाहण्याची आपली इच्छा असल्याचही उमा भारती यांनी पत्रात सांगितलं आहे.
राजकारणात आडवाणी यांच्या सोबत दिर्घकाळ काम केल्याचे तसेच आडवाणींसोबत आपण राजकारणातील अनेक बरे वाईट दिवस पाहिले आहेत. सध्या लालकृष्ण आडवाणी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या लढाईला तोंड देत आहेत. अशा वेळी आडवाणींना पाठिंबा देण्यास आपल्याला आनंद होईल असं उमा भारती यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा