सोमवार, ९ मार्च, २००९

नांदा सौख्यभरे!


भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती भंगणार की अभेद्य राहणार हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. भाजप-शिवसेनेतील सर्वच वाद संपल्यात जमा असल्याचं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं आहे. युतीचा २२-२६ चा फॉर्म्यूला कायम असल्याचही मनोहर जोशी यांनी सांगितलं आहे.शिवसेना आणि भाजप हे एकमेकांचे 22 वर्षापासून चिरंतन पुरातन साथीदार म्हणून ओळखले जातात. शिवसेना भाजपच्या युतीवर काही राजकीय घडामोडींमुळे प्रश्न चिन्ह लागले होते.छगन भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. छगन भुजबळांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतल्यापासून चर्चेला ऊत आला होता. राजकीय समीकरण बदलणार का? शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती होईल का? शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा सोडेल का? यावर चर्चेची गुऱ्हाडे सुरू झाली होती.शिवसेना राष्ट्रवादीच्या युतीवरून काँग्रेस पक्षासोबत भाजपच्या गोटातही चिंता वाढली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा