शनिवार, १४ मार्च, २००९
हाय प्रोफाईल मौनी खासदार
निवडणुका जवळ आल्या की त्या जिंकण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब राजकारणी करतात. आश्वासनांचा पाऊस पाडतात पण आपल्या मतदारसंघाचे प्रश्न असोत की राष्ट्राला भेडसावणाऱ्या समस्या असोत अनेक लोकप्रतिनिधी संसदेत तोंडच उघडत नाहीत. लोकसभेत किंवा राज्यसभेत पहिल्यांदाच निवडून जाणारे खासदार मौनव्रत बाळगतात किंवा तिथल्या वातावरणाला बु
जतात म्हणून प्रश्न विचारण्याचं धाडस करत नाहीत असंही अनेकदा म्हटलं जातं. मात्र नवख्या नाही तर चक्क बड्या आणि हाय प्रोफाईल नेत्यांनीही लोकसभेत मौनव्रत धारण केल्याचं लोकसभेच्या रेकॉर्डवरून दिसतं. यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. सोनिया गांधींनी पाच वर्षात एकही प्रश्न विचारला नाही तसचं फक्त तीन चर्चांमध्ये सहभाग घेताला. अटलबिहारी वाजपेयीं सारख्या गाजलेल्या संसदपट्टूची कामगिरीही फारशी उल्लेखनीय नाहीय. अटलबिहारी वाजपेयींनी सात चर्चांमध्ये भाग घेतला आणि एकही प्रश्न विचारला नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा