“महाराष्ट्रात काय होईल हे मला माहित नाही पण नॉर्थ इस्टमध्ये मेघालय सरकार फक्त एका मतासाठी पडलं. राष्ट्रवादीचे नेते तारिक अन्वर यांच्यासाठी बिहारमध्ये काँग्रेस एक जागा सोडू शकत नसेल राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत का जावं” असं राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते पी ए संगमा यांनी दिल्लीत म्हटलं आहे.
दहशतवादी कसाबला ताज हॉटेलसमोर फाशी द्या –गोपीनाथ मुंडेंची विधानसभेत मागणी
मी आणि भूजबळही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत – गोपीनाथ मुंडे यांचं विधान सभेत स्पष्टीकरण, याबाबतीत आमच्या विरोधात अपप्रचार केला जातोय- गोपीनाथ मुंडे
बीडचे राष्ट्रवादीचे खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश.
वरूण गांधी यांचे पिलिभित येथील प्रक्षोभक भाषण प्रकरण
वरूण गांधींचा अलाहाबाद हायकोर्टात एफआयआर रद्द करण्यासाठी अर्ज दाखल.
मी ग्राऊंड रियालिटी मान्य केली पाहिजे, पंतप्रधानपदासाठी पुरेसं संख्याबळ लागतं अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत दिली.
दिल्लीत आयपीएलच्या संयोजनाविषयी शरद पवार आणि विजय मल्ल्या यांची भेट झाल्याची चर्चा
लोकसभेसाठी शिवसेनेच्या 22 पैकी 15 उमेदवारांची यादी जाहीर, पुढच्या महिन्यात प्रचाराचा नारळ फोडणार - उद्धव ठाकरे यांच्याकडून घोषणा
कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटेवर- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांची माहिती.
सदाशिवराव मंडलिक कोल्हापुरातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार
गुरुवार, १९ मार्च, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा