मंगळवार, १७ मार्च, २००९

बिहारमध्ये लालू यादव रामविलास पासवान यांची युती

बिहारमध्ये लालू यादव रामविलास पासवान यांच्यामध्ये झालेल्या सहमती नुसार 25 जागांवर राष्ट्रीय जनता दल तर 12 जागांवर लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.काँग्रेससाठी राज्यात ते तीन जागा सोडणार आहेत.रामविलास पासवान यांनी बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीसाठी लालू यादव यांच्याकडून 16 जागांची मागणी केली होती, त्यापैकी 12 जागांवर सहमत झालं आहे.लालू यादव आणि राम विलास पासवान यांची युती होईल की नाही?याबाबत अनेक अंदाज, तर्कवितर्क काढले जात होते शेवटी युती झाल्यानं चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मंगळवारी त्यांनी एकत्र निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.दिल्लीत संय़ुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.तिसऱ्या आघाडीचे आम्हाला काहीही सोयरे सुतक नसुन तसेच आरजेडी तसेच राष्ट्रीय जनशक्ती पार्टी हे यूपीएचे घटक पक्ष म्हणून कायम राहणार असल्य़ाचही म्हटलं आहे.आमची युती ही साप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी असून युती करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा